खाजगी सीसीटीव्ही फुटेज शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ
वसमत (Vasmat stolen Case) : शहरातील विष्णूनगर भागात रविवारी भर दुपारी धाडसी घरफोडी झाली होती या धाडसी चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा पाच लाख ८७ हजार ६०० रुपयाचा ऐवज चोरी (Vasmat stolen Case) झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील रहिवाशांच्या घरातील व दुकानातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
रविवारी दुपारी एकच्या सुमारास वसमत शहरातील विष्णूनगर भागातील रहिवाशी सूर्यकांत बेंबळगे यांच्या (Vasmat stolen Case) घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केली यांच्या मुलाचे लग्न असल्याने सर्व कुटुंब शहरातील मंगल कार्यालयात गेलेले होते घराला कुलूप लावून कुटुंब गेल्यानंतर चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने एक लाख ५ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. वाढदिवसा दुपारी झालेल्या या चोरीने वसमत शहरात खळबळ उडाली आहे.
चोरी प्रकरणी सूर्यकांत बंडाप्पा बेंबळगे यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यामध्ये पस्तीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, दीड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण आणि एक लाख ५ हजार रुपये रोख असे एकूण पाच लाख ८७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. चोरी झाल्यानंतर श्वानपथक ठसे तज्ञाचे पथक घटनास्थळी येऊन तपासणी करून गेले मात्र कोणताही माग लागला नाही चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वसमत शहर पोलिसांनी परिसरातील रहिवासी व रस्त्यावर असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करणे सुरू केले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणी नंतर चोरांचा माग लागेल असा पोलिसांचा विश्वास आहे. वसमत शहरातील भर वस्तीत मुख्य रस्त्यावर असलेल्या घरात भर दिवसा धाडसी चोरी झाल्याने वसमत शहरात खळबळ उडाली आहे आता या चोरीचा तपास लागतो किंवा कसे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसमत शहरात सीसीटीव्ही नसल्याचा चोरटे घेत आहेत फायदा एक लाख लोकसंख्या असलेल्या वसमत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत शहरातील रस्त्यावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत या गंभीर प्रकाराची प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही चोरट्यांना मात्र सीसीटीव्ही बंद आहेत हे पक्के माहित आहे त्यामुळे ते या प्रकाराचा फायदा घेत आहेत यापूर्वी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरटे फरार झाले होते त्याचा शोध लागलेला नाही सीसीटीव्ही फुटेज नाही म्हणून चोरांचा तपास लावणे अवघड होऊन बसले आहे,
लहानसहान घटना भुरट्या चोर्या मोटरसायकल चोरी टवाळखोरांच्या कारवाया हे (Vasmat stolen Case) प्रकार सीसीटीव्ही नसल्यामुळे त्याचा तपास लावणे अवघड होऊन बसले आहे चोरटे या प्रकाराचा फायदा घेत आहेत वसमत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी करावी करणारे निवेदन मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आले मात्र अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम झाले नसल्याची माहिती गजानन कापूसकरी, सत्यनारायण नखाते, दिगंबर हुसे, मनमथआप्पा बेले,महादेव बेले, रमेश पत्रे, यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली.