चालकासह सहा मजूर गंभीर जखमी, सावर्डी येथील घटना
नांदगाव पेठ (Vehicle Accident) : संत्रा तोडण्यासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचे संतुलन बिघडल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास महामार्गावरील सावर्डी येथे घडली. (Vehicle Accident) घटनेत जमुना देविदास सावंत (२५) रा.शासकीय वसाहत, नांदगावपेठ यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातातील अन्य ७ गंभीर जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाला झोपेची गुंगी आल्याने अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, एमएच-०६-बीडब्ल्यू-०५३४ क्रमांकांच्या या वाहनाने काही मजूर शेंदोळा येथे जात असतांना सकाळी १० वाजताच्या दरम्यान सावर्डी या (Vehicle Accident) गावाजवळ वाहनचालकाला झोपेची गुंगी आल्याने वाहनाचे संतुलन बिघडले आणि वाहन पलटी झाले. यामध्ये जमुना देविदास सावंत या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अनिता दिलीप तांबे व राजेश्री राजेश तोडासे (वय २८ वर्ष) जयश्री राजेश तोडासे (वय १९ वर्ष) दोन्ही रा. फुटफुले नगर अमरावती, चालक शेख अफजल शेख वसीम (वय ३० वर्ष) रा. सय्यदपुरा नांदगावपेठ व अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच घटनेच्या काही वेळातच नांदगावपेठ पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळावरील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Vehicle Accident) इर्विनमध्ये डॉक्टरांनी तपासणीनंतर जमुना सावंत यांना मृत घोषित केले. तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.फिर्यादी सागर तात्या सोळंवे वय २४ वर्ष व्यवसाय राजकाम रा. शासकीय वसाहत नांदगांवपेठ यांच्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरुद्ध बीएनस कलम २८१, १२५(A), १२५ (B), १०६ (२) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.