‘विरासत ए बंजारा’चे विकास कामाच्या अनावरण सोहळ्याला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे
पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे आवाहन
मानोरा (Virasat e Banjara) : बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ‘विरासत ए बंजारा’ (Virasat e Banjara) संग्रहालय उभारले जात आहे. त्याचे विकास काम सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात असून, येत्या २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याहस्ते नंगारा वास्तूचे अनावरण केले जाणार आहे. तरी देशभरातील बहुजन, बंजारा समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ – वाशीम जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी केले आहे.
पोहरादेवी येथे (Virasat e Banjara) नंगारा प्रति कृती वास्तू संग्रहालयाचे निर्माण कार्य तत्कालीन (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रसंत डॉ. रामरावक बापू महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन ३ डिसेंबर २०१८ रोजी झाले होते . आता ६ वर्षानंतर हे विकास आराखडा काम आता पूर्ण झाले आहे. गुरुवार २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा म्युझियम वास्तूचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार व पालकमंत्री ना. संजय राठोड (Sanjay Rathore) तसेच महंत साधु संतांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी माझ्या बहुजन व बंजारा समाज बांधवांनी तसेच लाडक्या भगिनींनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी केले आहे.




