माजी मंत्री चेअरमन बसवराज पाटील यांची सर्वसाधारण सभेत घोषणा!
उमरगा (Vitthalsai Sugar Factory) : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. हंगाम २०२५-२६ मध्ये ५.११ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरवून गळीत हंगाम २०२५-२६ चा बॉयलर प्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम (Launch Event) पुढील आठवडयात होणार असल्याची घोषणा माजीमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मा. श्री. बसवराज पाटील यांनी यावेळी सभेच्या अध्यक्षपदावरुन बोलताना दिली.
उपस्थित सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयांना टाळयांच्या गजरात मंजुरी दिली!
या सभेत सर्व उपस्थित सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयांना टाळयांच्या गजरात मंजुरी दिली. विषय पत्रिकाचे वाचन प्र. कार्यकारी संचालक मा.श्री. एस. आर. गवसाणे यांनी केले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री.बापुराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन मा. श्री. शरण पाटील संचालक सर्वश्री ॲड. सुभाष राजोळे, केशवराव पवार, रामकृष्णपंत खरोसेकर, शब्बीर जमादार, दिलीपराव पाटील, संगमेश्वर घाळे, शरणप्पा पत्रिके, राजीव हेबळे, माणिकराव राठोड, दत्तू भालेराव, श्रीमती मंगलताई गरड, सौ. इरम्माताई स्वामी, शिवलिंग माळी, ॲड. संजय बिराजदार तसेच प्रकाश आष्टे, बलभिमराव पाटील, मा.प्रा. दिलीप गरुड, प्राचार्य राम सोलंकर, प्राचार्य श्रीराम पेठकर, दिपक मुळे, हरि लोखंडे, शिवशंकर जट्टे, रशिद शेख आदी मान्यवर कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे यांनी केले. आभार प्रदर्शन संचालक विठ्ठलराव बदोले यांनी केले. सुत्रसंचालन केन अकौंटंट राजु पाटील यानी केले.