वातानुकूलित यंत्र काढणे झाल्यानंतर मनसेच्या वतीने फटाके वाजवीत आनंद उत्सव साजरा!
परभणी (Department of Public Works) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागील आठ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अनधिकृत एसी काढण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता. त्या अनुषंगाने आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथील अन्नद्रविकृत आठ एसी वर कार्यवाही करत त्या एसी संबंधित कार्यालयाच्या विद्युत विभागाच्या मार्फत एसी काढण्यात आले आहेत. दरम्यान, या एसी तर काढल्यातच असे परभणी जिल्ह्यात विविध कार्यालयात अनधिकृत एसी आहे. त्यात मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयातील ही एसी काढण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवासी लाहोटी यांनी दिला आहे. वातानुकूलित यंत्र काढल्यानंतर, मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर फटाके वाजवीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, मानविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे समवेत बहुसंख्य पदाधिकारी (Office Bearer) कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.