अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आ. रत्नाकर गुट्टे यांची मागणी ..!
परभणी/गंगाखेड (Farmers loans) : अर्थसंकल्पीय अधिवेशनात २९३ अन्वये प्रस्तावाच्या अनुषंगाने झालेल्या शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या चर्चेत सत्ताधारी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सहभाग घेत राज्यातील विविध घटकांचे प्रश्न, समस्या व अडचणी मांडत विविध संकटांचा सामना करून इमाने इतबारे काळ्या आईची सेवा करणार्या शेतकरी बांधवांच्या अडचणी व संकट दूर करण्यासाठी (Farmers loans) कर्जमाफी करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
यावेळी बोलताना आ. डॉ. गुट्टे म्हणाले की, निसर्गाची साथ व शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे (Farmers loans) शेतकरी बांधव कर्जबाजारी झाला आहे. यातूनच दरदिवशी कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवाना संकट मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकरी बांधवांना कर्ज माफी देऊन कर्ज मुक्त करावे अशी मागणी केली.
याबरोबरच गंगाखेड विधानसभा मतदार संघात असलेल्या २८४ गावात जाणारे ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत दयनीय झाले असल्याने नागरिकांच्या सोईसाठी मतदार संघातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत किमान ३०० किलोमीटरचे रस्ते मंजूर करून भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. राज्याच्या अनेक भागात शेतीचा पोत कमी होत चालला आहे. रासायनिक खतांचा वापर व इतरही काही कारणे आहेत.
त्यामुळे राज्यात असणार्या जवळपास ४०० साखर कारखान्यातील प्रेसमडचा वापर करून शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी धोरण आखण्यात यावे. उपजिल्हा रूग्णालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहे. (Farmers loans) लोकसंख्येच्या दृष्टीने योग्य मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, डोंगरी भाग घोषित करावा, नदी संवर्धनासाठी गोदावरी नदी पात्रात जाणार्या सांडपाण्याचे आधुनिक पद्धतीने योग्य नियोजन करावे, गंगाखेड तालुक्यात अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशा विविध मागण्या ही आ.डॉ.गुट्टे यांनी केल्या आहेत.