२२ फेब्रुवारी रोजी झाले होते उद्घाटन
हिंगोली (Hingoli District Court) : येथील जिल्हा सत्र न्यायालय हिंगोली चा लोकार्पण सोहळा २२ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत – मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर अवघ्या सहा दिवसात पहिल्या मजल्यावरील १२३ नंबरच्या कक्षाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स च्या बाजूला असलेल्या भिंतीच्या फरशा निखळून पडल्याने इमारतीचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे.
हिंगोली येथे प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय (Hingoli District Court) यापूर्वी अस्तित्वात नव्हते, न्यायालयाचा सर्व कारभार परभणी येथील प्रमुख जिल्हा न्यायालयाकडून चालविल्या जात होता परंतु २२ फेब्रुवारी रोजी प्रमुख जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह मुंबई 5 उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व परभणी व हिंगोली न्यायालयाच्या न्यायमूर्ती त्यांच्या उपस्थितीत थाटामाटात झाले.
त्यानंतर अवघ्या सहा दिवसात पहिल्या मजल्यावर १२३ नंबरच्या कक्षाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स च्या बाजूला असलेल्या भिंतीच्या फरशा निखळून पडल्या. या फरशांनी निखळून पडल्याने मोठा आवाज आल्यामुळे (Hingoli District Court) न्यायालयातील वकील मंडळी सह कर्मचारी व पक्षकारही जमा झाले होते. हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत चार मजली असून विविध सुविधा न्यायालयीन कर्मचारी व न्यायासन आणि न्यायमूर्तीच्या रूममध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.
परंतु २८ फेब्रुवारी ला दुपारच्या पहिल्या मजल्यावर भिंतींच्या वर्षा निखळून पडल्याने या बांधकामाच्या कामाबद्दल तर्कवितर्क बोलले जात आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर ई-सेवा केंद्राच्या समोर पक्षकाराकरिता बसण्याकरिता ठेवण्यात आलेल्या दोन खुर्चा मोडल्याचे दिसून येते. तसेच (Hingoli District Court) जिल्हा न्यायालयाच्या वकिलासाठी पहिल्या मजल्यावर वकील रूम देण्यात आली आहे. चार मजल्याच्या इमारतीतील मध्ये फक्त फर्स्ट फ्लोवर वर एकच कक्ष दिल्याने वकिलांना त्यांचे कामकाज इतरत्र बसून करावी लागत आहे. दरम्यान सहा दिवसाच्या आत जिल्हा न्यायालयाच्या पहिल्या मजल्या वरील भिंतीच्या परश्या निखळल्याने बांधकाम किती दर्जेदार झाले याचा नमुना समोर आला आहे.