Wardha :- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळविल्याप्रकरणी तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात (Police station)गुन्हा(Crime) नोंद करण्यात आला होता. हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात खात्रीशीर मुखबिर लावून व तांत्रिक तपास करण्यात आला.
अल्पवयीन मुलीस पळवून नेलेल्या आरोपीस पुणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली
आरोपी कुणाल उर्फ कुंदन जयसिंग चव्हाण (वय 21) हा पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने शिताफीने सापळा रचून आरोपी हिंजेवाडी, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. यातील पीडित अल्पवयीन मुलीससुद्धा ताब्यात घेण्यात आले. आरोपीस अटक करण्यात आली. असून पुढील तपास सेलू पोलिस करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात सुभाष राऊत, दिवाकर परिमल, संजय राठोड, नितेश मेश्राम, शबाना शेख, नवनाथ मुंडे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, स्मिता महाजन यांनी केली.