वसमत शहर पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल
वसमत (Wasmat Policewoman) : शहरातील सोमवार पेठ भागात अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याकरीता गेलेल्या पोलिस महिलेला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी ११ जूनला पाच जणांवर वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, (Wasmat Policewoman) जिल्ह्यात अवैध दारू विक्रीवर परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील १३ ही पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाला दिल्या आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी कारवाईचे सत्र सुरू आहे.
वसमत शहरातील सोमवार पेठ भागात एका घरामध्ये बेकायदेशीर दारूचे गाळप करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक बालाजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कर्मचारी अंबुताई चव्हाण यांचे पथक ११ जूनला सायंकाळी कारवाईसाठी गेले होते. त्यांनी (Wasmat Policewoman) सदर घरावर छापा मारताच एका व्यक्तीसह चार महिलांनी महिला पोलिस कर्मचारी चव्हाण यांना शिवीगाळ करून घरामध्ये जाण्यास मज्जाव केला.
तसेच त्यांचे दोन्ही हात पिनगाळून त्यांना मारहाण केली. या (Wasmat Policewoman) प्रकरणी चव्हाण यांनी वसमत शहर पोलिसात रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून शांताबाई रमेश पवार, जया रमेश पवार, राणी रमेश पवार, रूपा रमेश पवार यांच्यासह रमेश गणाजी पवार या पाच जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड हे करीत आहेत.