बारव्हा येथील प्रकरण
बारव्हा (Water Purification Centre) : ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना कमी पैशात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून बारव्हा येथे १० लक्ष रुपये किमतीचे जल शुद्धीकरण केंद्र (आरओ) (Water Purification Centre) मंजूर करून त्याचे काम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. मोठ्या थाटामाटात उदघाट्न करण्यातही आले. मात्र या सहा महिन्याच्या कालावधीत अनेकदा हे केंद्र बंद पडले असून आता तीन दिवसापासून हे जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे. त्यामुळे बारव्हा वासियांची शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी धडपड सुरु असली तरी नाईलाजाने विहीर, बोअरवेलच्या दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आरओ प्लांट त्वरित दुरुस्त करून शुद्ध जल उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लाखांदूर तालुक्यातील बारव्हा हे नावाजलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३ हजाराच्या आसपास आहे. बारव्हा गावातील १-२ बोअर व २-३ विहारी वगळता बाकी बोअर व विहीरीचे पाणी हे पिण्यायोग्य नाही. तसेच बारव्हा येथे ७० लाख रुपये किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. त्या योजनेचे पाणी नळाद्वारे घराघरात पोहचत आहे. मात्र या (Water Purification Centre) योजनेची मुख्य विहीर ही नदीत असल्याने पावसाच्या दिवसात माती मिश्रित गढूळ पाणी येत असल्याने ते पिण्यायोग्य नसते. ही बाब या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांच्या लक्षात आणून देण्यात आली.
त्यांनी नागरिकांना कमी पैशात, थंड व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे. या हेतूने बारव्हा येथे १० लक्ष रुपये किंमतीचे आर ओ प्लांट मंजूर करवून दिले. त्याचे काम ही सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. केंद्राचे उदघाट्नही करण्यात आले. नागरिकांना ५ रुपये किमतीत २० लिटर थंड व शुद्ध पाणी मिळत असल्याने ग्रामस्थनी आनंदही व्यक्त केला. मात्र मागील तीन दिवसापासून आर ओ प्लांट बंद असल्याने पुन्हा नागरिकांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सहा महिन्याच्या कालावधीत कित्येकवेळा या केंद्रात बिघाड आलेले असून हे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात आले की नाही, याचीही उच्चस्तरिय चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली असून ग्रामपंचायत प्रशासनाने बंद पडलेले (Water Purification Centre) आरो प्लांट त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.