लाखनी जवळील मानेगाव/सडक येथील घटना
भंडारा (Car-Bike Accident) : लाखनी जवळील मानेगाव/सडक येथे दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील (Car-Bike Accident) पत्नीचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला. वैशाली विजय शेंडे (४८) रा.शिवनी/मोगरा असे मृतकाचे तर विजय भजीराम शेंडे (५०) असे जखमीचे नाव आहे.
लाखनी तालुक्यातील शिवनी/मोगरा येथील विजय शेंडे हा पत्नी वैशाली हिचेसोबत मोटारसायकल क्र.एम.एच.३६/सी.८९८० या गाडीने शिवनी गावावरून लाखनीकडे जात असताना मानेगाव/सडक येथे महामार्गावर ट्रक क्र.सी.जी.०४/एम.पी.०७८३ च्या चालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला मागेहून धडक दिली.
त्यात मागे बसलेली पत्नी वैशाली हिचा मृत्यू झाला तर विजय शेंडे जखमी झाला. जखमीला उपचाराकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघाताची माहिती लाखनी पोलिसांना मिळताच त्यांनी (Car-Bike Accident) घटनास्थळ जाऊन पंचनामा केला. अपघाताची नोंद लाखनी पोलिसात केली आहे.