बेतकाठी आणि बिहीटेकला गावातील घटना
कोरची (Wild boars attack) : येथून १० किमी अंतरावर असलेल्या बेतकाठी आणि बिहीटेकला येथील तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या दोन दिवसांत तीन महिलांवर रानडुकरांनी हल्ला केला. त्यात त्या Wild boars attack) जखमी झाल्या असून दोघींना गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एकीला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
८ मे बेतकाठीच्या जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या निराशा रविंद्र गुरवले (३०) या महिलेवर रानडुकराने हल्ला केला. त्यात तिच्या दोन्ही पायाला व कमरेला दुखापत झाली. तिला प्रथम ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. ७ मे रोजी बेतकाठी येथीलच नंदकुमारी तेजराम बघवा (४०) हिच्यावरही (Wild boars attack) रानडुकराने हल्ला केला. तिच्या सोबत कुत्रा होता. कुत्र्याच्या ओरडण्याने रानडुक्कर पळून गेला. तिला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले आहे.त्याच दिवशी बिहीटेकला येथील उर्मिला संतोष मिरी (४८) हिच्यावर सुध्दा रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. तिच्यावर सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती बेडगांवच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली असून जखमींना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे वनविभागाकडुन सांगण्यात येत आहे. (Wild boars attack) जंगलात हिंस्त्र पशु राहणे साहजिकच आहे. त्यामुळे जंगलात जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.
पत्ता फळी कंत्राटदार आणि ग्रामसभेत झालेल्या समझोत्यानुसार तेंदूपत्ता संकलन करीत असताना एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाईकांना दिड लाख रुपये, (Wild boars attack) जखमी झालेल्या मजुरांना पन्नास हजार रुपये औषधोपचाराचा खर्च देण्याचे ठरविले आहे, असे कंत्राटदार व ग्रामसभाचे यांच्यात झालेल्या करारानुसार नमूद आहे हे विशेष.