परभणीतील मानवत येथील प्रकरण
परभणी (Woman Abuse Case) : मतिमंद महिलेवर अत्याचार करणार्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधिश – २ अ.अ.अ. शेख यांनी दहा वर्ष कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची वसुल रक्कम २५ हजार रुपये पिडितेस देण्याचे आदेश दिले आहेत. (Woman Abuse) Case अत्याचाराची ही घटना मानवत पोलीस ठाणे हद्दित घडली होती.
जिल्हा व सत्र न्यायाधिशांचा निकाल
फेब्रुवारी २०२३ मध्ये मानवत पोलीस ठाण्यात मतिमंद महिलेच्या पतीने तक्रार दिली होती. आरोपी शेख मकसुद शेख नुर रा. मंगरुळ बु. याने मतिमंद महिलेस जबरदस्तीने घेवून जात तिच्यावर अत्याचार केला. पतीने आरडाओरड केली असता आरोपी पळून गेला. या प्रकरणी मानवत पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर सपोनि. आनंद बनसोडे यांनी तपास करत नयायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्पेâ अॅड. अभिलाषा पाचपोर यांनी पाच साक्षीदार तपासले. (Woman Abuse Case) युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश – २ अ.अ.अ. शेख यांनी आरोपी शेख मकसुद शेख नुर याला भादंवि कलक ३६३ अन्वये पाच सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड, कलम ३७६ (२)(जे) अन्वये दहा वर्ष कैद व दहा हजार रुपये दंड, भादंवि कलम ३७६ (२)(एल) अन्वये दहा वर्ष वैâद व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्यात मुख्य सरकारी वकिल ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अभिलाषा पाचपोर यांनी बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सपोनि. संतोष सानप, पोउपनि. सुरेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, वंदना अदोडे, सय्यद रहिम यांनी काम पाहिले.