विषारी द्रव पिलेल्या विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू, परभणीच्या पाथरी पोलिसात नोंद…!
परभणी (Woman commits suicide) : चप्पल, बुटाचा धंदा टाकण्यासाठी माहेराहुन पैसे घेऊन ये असे म्हणत २० वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. सासरच्या त्रासास कंटाळून विवाहितेने विषारी द्रव प्राशन केले. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान ८ ऑगस्ट रोजी विवाहितेचा मृत्यू झाला. (Woman commits suicide) विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर ९ ऑगस्टला पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक मस्के यांनी तक्रार दिली आहे. अक्षता आसेवार (वय २० वर्ष) असे मयत विवाहितेचे नाव आहे. खबर देणार यांची बहिण अक्षता हिचा विवाह पोखर्णी येथील युवकासोबत झाला होता. (Woman commits suicide) लग्नानंतर काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी चप्पल, बुटाचा धंदा टाकण्यासाठी पैशाची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून २८ जून रोजी अक्षता हिने विषारी द्रव प्राशन केले. तिला उपचारासाठी पाथरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथे पाठविण्यात आले. (Woman commits suicide) विवाहितेच्या श्वास नलीकेत गाठ तयार झाल्याने तिला हैद्राबाद येथे घेऊन जावे लागेल असे सांगण्यात आले. दरम्यान, त्रास वाढल्याने विवाहितेला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी ८ ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी तपासुन विवाहितेला मृत घोषीत केले. सदर प्रकरणी बालाजी आसेवार, दत्तराव आसेवार, छाया आसेवार, गोविंद आसेवार, सोनाली शिंदे यांच्यावर पाथरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि. स्वामी करत आहेत.