मुलींचा हुंड्यासाठी त्रास देणे हे घटना सातत्याने सुरू!
रिसोड (Women Harassment) : सद्यस्थितीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हुंड्यासाठी महिलांचा छळ ही नित्याची बाब झालेली आहे. मुलीच्या लग्नात कोणत्याही प्रकारची कमी राहू नये व जावयाला हुंड्यापायी (Dowry) मोठी रक्कम, मोठ्या रिसॉर्ट मध्ये लग्न, वराडी मंडळाची पूर्णतः सोय घेणे, लग्नात चांगले कपडे, आहेर, लाखो रुपये खर्च करून सुद्धा सासरच्या मंडळीकडून मुलींचा हुंड्यासाठी त्रास देणे हे घटना सातत्याने सुरू असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार रिसोड तालुक्यातील मोहजाबंदी येथील एका मुलीसोबत घडलेला आहे. अवघ्या 2 वर्षातच सासरकडील मंडळी कडून त्रास देणे, मानसिक छळ (Mental Torture) करणे हा प्रकार समोर आलेला आहे. यामध्ये नंनदची सुद्धा महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसत आहे.
सातत्याने मुलीला त्रास देणे सुरू!
रिसोड तालुक्यातील मोजाबंदी येथील अशोक पांडुरंग नागरे यांची मुलगी नूतनचा विवाह हिंगोली येथील अभिलेश घुगे याचे सोबत 14 /2 /2023 रोजी रिसोड येथील विश्वा लॉन मंगल कार्यालयमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. यासाठी अशोक नागरे यांनी लग्नासाठी (Marriage) कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही. वीस लाख रुपये खर्च करून सदर विवाह केला होता. यासाठी वर दक्षणा म्हणून 7,01,000/- रुपये दिलेत. तसेच कपड्याचे पैसे दिड लाख रुपेये वेगळे दिले. लग्न झाल्यानंतर, पंधरा ते वीस दिवस नवरीला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर, सातत्याने मुलीला त्रास देणे सुरू केले. यामध्ये नूतन हिची नणंद योगीनी रविंद्र सोनोने ही नेहमी घरी येऊन संसारात आडकाठी आणायची. सासू व पतीला नेहमीच भडकून मारहाण करावयाची. दिर नागेश हा वकील असुन, तो सुध्दा पुण्यावरुन गावी आल्यानंतर, मानसिक त्रास देत होता. तिला उलट-सुलट बोलायचा, तसेच तिच्या अंगावर धावुन जायायचा.
एकूण 11 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली!
सासू-सासरे मावस सासू सासरे व अन्य नातेवाईक हे घरी येऊन नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देत होते. स्वयंपाक येत नाही, चांगली दिसत नाही, कामधंदा करता येत नाही, आदी टोमणे मारायचे व सासू-सासर्याला भडकून द्यायचे. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर नूतन हिने रिसोड पोलीसात पती सासू-सासरे व अन्य असे एकूण 11 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली असून रिसोड पोलीस स्टेशन मध्ये अभिलेख पुरुषोत्तम घुगे (पती) वय 32 वर्ष, व्यवसाय नोकरी,पुरुषोत्तम रामकृष्ण घुगे वय 60 वर्ष, सुमन पुरुषोत्तम घुगे (सासु) वय 55 वर्ष, नागेश पुरुषोत्तम घुगे (दिर) वय 28 वर्ष व्यवसाय वकीली, श्रीधर रामकृष्ण घुगे (चुलत सासरे) वय 52 वर्ष व्यवसाय वकीली, निता श्रीधर घुगे (चुलत सासु) वय48 वर्ष, अमित श्रीधर घुगे (चुलत दिर) वय 25 वर्ष, योगीनी रविंद्र सोनोने (ननद) वय 26 वर्ष, रविद्र रघुनाथराव सोनोने (नंदोई) वय 35 वर्ष व्यवसाय मुख्याधिकारी नगर परीषद नशिराबाद, गजानन गणपतराव बांगर (माम सासरे) वय 45 वर्ष सोनु राजु नागेर (मावस सासु) वय 38 वर्ष, यांचे विरोधात रिसोड पोलिसांनी 498 323 34 नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करून पुढील तपास सुरू केला आहे.