साकोली (Pindkepar Alcohol Ban) : साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथील शेकडो महिलांनी दारूबंदी विरोधात एल्गार पुकारून पुढे सरसावल्या आहेत. दारूमुळे शालेय विद्यार्थी, तरुण, प्रौढ दारूच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर शालेय विद्यार्थी व तरुण दारूच्या व्यसनामुळे (Pindkepar Alcohol Ban) गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासोबतच गावात झगडे, भांडण असे प्रकार वाढलेले आहेत. गावात सुख, शांती व विकास याकरीता गावात दारूबंदी होणे गरजेचे आहे, यासाठी गावातील शेकडो महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदीचा निर्धार केला आहे.
पिंडकेपार ग्रामपंचायत अंतर्गत ग्रापं उपसरपंच सुरेश कवरे व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी चोपकर, तसेच पोलीस पाटील प्रमोद भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष ऋषी येरणे व गावातील बहुसंख्य महिला व पुरूषांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद शाळा (Pindkepar Alcohol Ban) पिंडकेपार याठिकाणी दारूबंदी हा विषय ग्रामसभेचा ठराव घेऊन करण्यात आला. त्यानंतर गावातील बहुसंख्य महिला व पुरूषांच्या उपस्थित संपूर्ण गावात फिरून दारूबंदी यासाठी महिलांची नारेबाजी करून गावातील दारु विकणार्यांना सूचना देण्यात आली.
त्यानंतर साकोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार एम.पी. आचरेकर यांनी आपली एका फोनवर त्वरित येऊन गावातील बहुसंख्य लोकांना (Pindkepar Alcohol Ban) दारूबंदी होईलच अशी शास्वती दिली. परंतु त्यासाठी लोकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये व दारु विकणार्यांना कडक शिक्षा करून गावातील दारु बंदी जनसहयोगाने करून गावात सुशासन निर्माण करू तसेच गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर व अभ्यासिका कक्ष तयार करावे जेणेकरून त्यामुळे आपल्याच गावातील अभ्यासू विद्यार्थ्यी कलेक्टर किंवा एस.पी बनेल.
यावेळी गावातील पोलिस पाटील प्रमोद भोयर यांनी ठाणेदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरथराम शहारे महाराज यांनी केले. तसेच गावातील उपस्थित महिलांनी गावातील (Pindkepar Alcohol Ban) दारु दुकानांमुळे परिवारात किती झगडे भांडण होतात, हे प्रत्यक्ष ठाणेदार यांनी सांगितले. गावातील दारूबंदी झालीच पाहिजे असे बहुसंख्य महिलांनी आपले मत व्यक्त केले.
त्यानंतर विश्वासाचा धागा म्हणजे राखी आणि हा धागा ग्रामपंचायत सदस्या ममता भुजाडे यांनी सर्वप्रथम ठाणेदार यांच्या हाताला बांधून गावातील दारु दुकानामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी सुध्दा राखीचा उत्सव साजरा करून बंधु प्रेम गावातील जनतेसमोर सादर केले. या क्षणाला ठाणेदार आचरेकर भारावून गेले आणि सांगितले की, या बहिण भावाच्या नात्याला मजबूत करून या गावाची दारूबंदी करण्यात येईल. शेवटी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य ग्रामविकास अधिकारी व गावातील जनतेच्या समोर ग्रामसभेचा ठराव देण्यात आला व या कार्यक्रमाचे आभार ममता भुजाडे यांनी केले.




