पाथरी तालुक्यातील बाभळगाव पेठ येथील घटना!
परभणी (Women Suicide) : परभणीतील पाथरी तालुक्यातील बाभळगाव पेठ येथे एका 28 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार 29 जुन रोजी सकाळी उघडकीस आली. मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती इम्रान रसुल शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल!
सलमा इम्रान शेख (वय 28 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. यासंदर्भात सलमाचा भाऊ कलीम युसुफ पठाण ( रा. आंबेगाव नाका, राज गल्ली, मानवत) यांनी पाथरी पोलिसात दिलेल्या प्रथम माहितीनुसार, सलमा हिचे लग्न सात वर्षांपूर्वी इम्रान रसुल शेख (रा. बाभळगाव पेठ) याच्याशी झाले होते. त्यांना समीर (वय 5 वर्षे) आणि शहबाज (वय 2 वर्षे) अशी दोन मुले आहेत. इम्रान यास दारूचे व्यसन असून गेल्या पाच वर्षांपासून तो सलमावर सतत मारहाण करत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाथरी येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) हलवला. घटनास्थळी पोनि. महेश लांडगे, सपोनि. स्वामी, हवालदार शितोळे यांनी भेट दिली. या प्रकरणी विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून पती इम्रान रसुल शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस (Pathari Police) करीत आहेत.
पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद!
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे रविवारी सकाळी 10.30 वाजता सलमाच्या मुलाकडून कलीम पठाण यांना फोनवरून तिच्या आत्महत्येची माहिती मिळाली. त्यानंतर, त्यांनी भाऊ आणि इतर नातेवाइकांसह पाथरी पोलीस ठाणे (Pathari Police Station) व त्यानंतर बाभळगाव येथे धाव घेतली. तेथे पोलीस उपस्थित होते. घराच्या छताच्या लोखंडी कडीला हिरव्या ओढणीच्या दोरीने सलमाने गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकरणी पती इम्रान रसूल शेख याच्या विरुध्द पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




