बारव्हा गावात पाण्यासाठी महिलांची पायपीट
बारव्हा (Water Supply Yojana) : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा या गावातील नळ योजना मागील चार दिवसांपासून बंद असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. परिणामी गावातील बोअर अथवा विहिरीचे दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित गावातील (Water Supply Yojana) पाणी पुरवठा सुरु करून नागरिकांना शुद्ध व स्वछ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार बारव्हा येथे मागील काही वर्षांपूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत (Water Supply Yojana) गावात नळ योजनेचे काम करण्यात आले होते. सदर योजनेंतर्गत गावातील नळाना पाच ते दहा मिनिटच गावात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तरी ग्रामस्थ त्याच पाण्यावर आपली तहान भागवीत आहेत. मात्र मागील चार दिवसांपासून गावातील नळ योजना (Water Supply Yojana) बंद असल्याने नागरिकांना दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
संबंधित नळ योजना का बंद आहे. यावर मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून यांना नागरिकांच्या आरोग्याशी काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी यांची जबाबदारी काय, हे त्यांना उमजले नसल्याचे यावरून दिसून येत आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष घालून बारव्हा येथील (Water Supply Yojana) पाणी पुरवठा सुरळीत करून महिलांची होणारी पायपीट थांबाविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.