जिल्हा परिषद कर्मचार्याचे ‘लोहपुरुष’ यश
यवतमाळ (LohPurush Half Iron Man) : मागील वर्षीच्या ३ किलोमीटर मालवण समुद्री जलतरण स्पर्धेत राज्याच्या सर्व जिल्हा परिषद कर्मचार्यांमध्ये एकमेव स्पर्धक म्हणून यशस्वी ठरल्यानंतर, त्यांनी आता कोल्हापूर येथे ५ ऑक्टोबर २०२५ रविवार रोजी आयोजित (LohPurush Half Iron Man) लोहपुरुष हाफ आयर्न ट्रायथलॉनमध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग २ चे कर्मचारी मिलिंद प्रभाकरराव सोळंके यांनी वयाच्या ५० व्या वर्षी राज्य उपविजेते होण्याचा बहुमान मिळवला असून त्यांच्या टीमचे या स्पर्धेत मोठे यश मिळवले आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या रिले हॉफ आयर्न ट्रायथलॉन स्पर्धेत (LohPurush Half Iron Man) त्यांनी आपल्या ‘क्रीडाभारती सायकलिंग ग्रुप ३’ संघाचे यशस्वी नेतृत्व केले. यामध्ये यवतमाळ मधील १८ पुरुष व एक महिला स्पर्धकांनी लोहपुरुष हाफ आयर्न मॅन स्पर्धा मध्ये २ किलोमीटर स्विमिंग,९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावणे ही स्पर्धा वेळेच्या आधी पूर्ण करून यवतमाळचे नाव महाराष्ट्र राज्यात सन्मानाने मोठे केले.
विजयी यवतमाळकर स्पर्धकांमध्ये नीता कुंटावार, मिलिंद सोळंके, राहुल सार्वे,राम तांबोळी, डॉ. हर्षल झोपाटे,वसंत राठोड, इंजि.सुरेश भुसंगे, शैलेश देशमुख, अभिजित राऊत, संग्राम धोटे, शैलेश भांडेकर, राजेश लोणकर,दुष्यंत कुमारकर, श्रीकांत आसेकर, आशिष संगेकर ,चिन्मय कुंटावार, बबन बांबर्ड,डॉ. विजय जाधव,डॉ.महेश मनवर यांचा समावेश आहे. (LohPurush Half Iron Man) लोहपुरुष स्पर्धेत यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी व कोल्हापूर येथील विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतः या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी झाले व स्पर्धा पूर्ण केली.
पूर्ण आयर्न मॅन स्पर्धा जिंकणे पुढील लक्ष : मिलिंद सोळंके
मालवण येथे मिळालेल्या समुद्री यशाने आत्मविश्वास वाढवला.जिल्हा परिषदेतील कामासोबतच रोज सकाळी वेळेचं योग्य नियोजन करून हे यश मिळालं आहे.क्रीडाभारती सायकलिंग ग्रुप व त्या मधील सहकारी मित्र जलतरण टीम मधील सर्व सहकारी मित्र व मार्गदर्शक यांनी प्रोत्साहन दिले.पुढील वर्षी माझे लक्ष्य पूर्ण आयर्न मॅन स्पर्धा जिंकणे असे मत जि.प.बांधकाम विभाग २ चे कर्मचारी मिलिंद प्रभाकरराव सोळंके यांनी व्यक्त केले.