Yawatmal :- पुणे (Pune) येथे शिक्षणाकरीता व नोकरी करणार्या प्रवाशी जनतेच्या सेवेसाठी व दिवाळी सारख्या सणानिमीत्त घरी येण्या करीता व आलेल्या प्रवाश्यांना पुणे येथे परत जाण्याकरीता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Transport Corporation) यवतमाळ विभाग यवतमाळ वे वतीने पुणे जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
दिवाळी निमित्त विशेष उपाययोजना
त्यामध्ये दिवाळी पुर्वी पिंपरी चिंचवड बसस्थानक, पुणे येथुन यवतमाळ मार्गे शेलुबाजार व पिंपरी चिंचवड बसस्थानक, पुणे येथुन पुसद करीता १५ ऑक्टोबर २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रवाशी उपलब्धतेनुसार दररोज २ ते ४ फेर्या सायं १८.३० ते २०.०० या वेळेत नियोजीत करण्यात आलेल्या आहेत. सदर मागनी वाहतुकीकरीता परिवर्तन बसेसचे नियोजन करण्यात आले असुन सदरच्या फेर्या या महामंडळाचे अधिकृत आरक्षण वेबसाईड व एमएसआरटीसी ऑनलाईन रिर्सव्हेशन या अँड्राईड अॅप वर ऑनलाईन आरक्षणाकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच २३ ते २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत यवतमाळ ते न्यु शिवाजी नगर पुणे व पुसद ते न्यु शिवाजी नगर पुणे अश्या दररोज २-३ फेर्या सायं १८.३० ते २०.०० या वेळेत नियोजीत करण्यात आलेल्या असुन सदर च्या फेर्या ऑनलाईन(online) आरक्षणाकरीता वरील नमुद वेबसाईट व अॅन्ड्राईड अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
असे पत्र महामंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरीही प्रवाशी जनतेस आवाहन करण्यात येते की आपला प्रवास एस. टी. बसनेच करून सुखी व सुखरूप सेवेची संधी महामंडळाला देण्यात यावी.