Pandharkawada :- केळापुर तालुक्यातील पाटणबोरी येथील बहुचर्चीत जॅकपॉट (Jackpot)वाईनबार मध्ये सुरु असलेल्या आतंरराज्यीय जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड मारुन ५ लाख ८४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पोलीसांनी २० जुगार्यांना घटनास्थळावरुन ताब्यात घेतले असुन जॅकपॉट बारच्या मालकास फरारीमध्ये टाकले आहे. पोलीस विभागाचेच (Police department)समर्थन मिळत आलेल्या या जुगार अड्ड्यावर अखेर २२ रोजी सायंकाळ दरम्यान पांढरकवडा पोलीसांनी धाड मारली.
५ लाख ८४ हजाराचा मुद्देमाल जप्त, २० जुगारी ताब्यात, एक फरार
जॅकपॉट बारचे मालक ओम संजय सिर्तावार यांच्या सांगण्यावरुन शेख आसीफ शेख चांद रा.पारवा ता. घाटंजी हा बारच्या मागील रुमध्ये लोकांना गोळा करुन अवैद्यरित्या जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. तेव्हा एपीआय सागर पेंढारकर यांनी आपल्या पथकातील कर्मचार्यांसह तेथे धाड मारली. यावेळी तेथे त्यांना शेख आसिफ शेख चांद (४०) रा . पारवा, शेख नसीर शेख मदार (५३) रा.अदिलाबाद, शेख रउफ शेख उस्मान (४६) रा. आर्णी, शेख रहेमान शेख अब्दुल (५०) रा. घाटंजी, राजु नानाजी वाघ (४७) रा. घाटंजी, सद्दाम रज्जाक शेख (३२) रा.पारवा, अंकुश केशव नागेकर (३५) रा.तिवसाळा तालुका घाटंजी, दत्ता लक्ष्मण कापडे (२४) रा. कोदोरी, सतीष पिराजी अंडेवार (४८) रा. अदिलाबाद, मल्लारेड्डी शेकन्ना पानाजवार (६५) रा. चनाखा, पंकज रंजनराव भोयर (३९) रा.घुबडी, नामदेव जिवन नव्हाते (४०) रा.घाटंजी, रुपेश भाउराव भोयर (४६) रा.खापरी ता. घाटंजी, राजेश शिवप्रसाद धुत (४८) रा अदिलाबाद, आशिष संतोष करनमवार (२७) रा. मांडवी, रामकिसन माधव किनाके (५९) रा. टेंभी, राजेश उध्दव बोबडे (३२) रा. घाटंजी, उदय महेश गुप्ता (३७) रा. घाटंजी, फिरोज अयुब खान (३६) रा.आर्णी, आकाश रामराव मोहिते (३०) रा. पारवा हे जुगार खेळतांना आढळुन आले. पोलीसांनी सर्व जुगार्यांना ताब्यात घेतले. या कार्यवाहीमध्ये पोलीसांनी ओम संजय सिर्तावार यांला फरार घोषीत केले आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल, पोलीस निरिक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सागर पेंढारकर, पो कर्मचारी गजानन पत्रे, राम राठोड, किशोर आडे, विकेश ध्यावर्तीवार, सुर्यकांत गिते आदिंनी केली आहे.