नाशिक(Nashik):- दिंडोरी मतदार संघातील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State Dr. Bharti Pawar) यांना परिसरातील कांदा उत्पादक (Onion grower) शेतकऱ्यांनी जेरीस आणले असून कांद्यामुळे त्यांचा वांदा होण्याची शक्यता परिसरातून व्यक्त होत आहे. याशिवाय मतदारांकडून त्यांच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार सुरू झाला आहे. त्यामुळे या सर्व समस्यांना त्या कशा तोंड देतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
याबाबत त्यांना विचारणा करण्यात येत आहे की, मागील निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी प्रामाणिक न राहता अचानक भाजपचे उमेदवार (BJP candidate) म्हणून सक्रिय झाल्या. नेमक्या अडचणीच्या वेळी शरद पवारांशी दगा फटका करून स्वार्थ म्हणून पक्ष का बदलला? गेल्या पाच वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंतप्रधान मोदींचे (Prime Minister Modi) व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कमीत कमी कांद्याची माळ लोकसभेत घालून लक्ष का वेधले नाही?
पोळ कांदा व लाल कांदा (Pol Kanda and Red Onion) उत्पादनासाठी प्रती हेक्टरी किती खर्च येतो हे जाहीर का करत नाही? जवळजवळ एक लाख रुपये कींमतीची खते, रासायनिक औषधे वापरल्यास एक हेक्टरवर खर्च येतो. त्यावर अठरा टक्के जीएसटी आकारला जातो. म्हणजे शेतकऱ्यांकडून प्रति हेक्टर १८ हजार रुपये पाठीमागच्या खिशातून गुपचूप काढून या जखमेवर मलम म्हणून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये कशा करिता वाटप करता? सरळ सरळ शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खते, औषधे, बी बियाणे, शेती अवजारे यावरील जीएसटी (GST) रद्द का करत नाही ?
संपूर्ण देशामध्ये २०२२-२३ मध्ये साधारणता ३०-३५ लाख मॅट्रिक टन कांद्याचे उत्पादन होत असताना ३१ मार्च नंतर फक्त तीन लाख मॅट्रिक टन कांदे निर्यातीला परवानगी देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली नाही का ? नाफेड कडून कांदा खरेदी करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबीयांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या स्वतःच्याच कंपन्या काढून शेतकऱ्यांचे व शासनाचे लूटमार करण्याचे धोरण अवलंबिले नाही का ? घाऊक व्यापाऱ्यांवर इन्कमटँक्स(IncomeTax), ईडी(ED), सीबीआयच्या (CBI)धाडी टाकून दहशत निर्माण करून कांद्याचे गेल्या पाच वर्षात अनेक वेळा जाणीवपूर्वक दर पाडले, याची जाणीव आपणास नाही का? कांद्याचे भाव हेतू पुरस्सर व शेतकरी हित विरोध विरोध म्हणून पाडले जातात. मग आज शेतकऱ्यांनी आपणास व आपल्या हुकूमशाही शेतकरी हीताच्या विरोधी मोदी सरकारला पाडले तर आपले मत विरोधात नोंदवाल का? कांदा निर्याती वरती किती शुल्क आणि ते शुल्क गरजेचे आहे का? या संदर्भात आपण खुलासा करू शकतात का?
भारताचा कांदा हा विविध देशांमध्ये निर्यात केला जातो. भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी असताना त्याचप्रमाणे बांगलादेश(Bangladesh), मलेशिया (Malaysia) आणि संयुक्त अमिराती हे प्रमुख कांद्याचे आयातदार देश असताना आपल्या धरसोडीच्या कांदा निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात पिळवणूक आली व शेतकरी देशोधडीला लागत आहे त्याबाबत आपले मत काय ? अनेक शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे शिक्षण विवाह थांबले आहे. आम्हाला आमच्या पोटाचे पडले असून आमच्या मुला मुलींच्या लग्नाच्या खर्चाचे पडले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा (Ram temple in Ayodhya) भपका दाखवू नका. पूर्व काळापासून आमच्या खेडेगावात राम मंदिर आहे. तसेच आमच्या पोटापाण्याच्या प्रश्नामुळे ३७० कलम सुद्धा आम्हाला गरजेचे नाही. आम्हाला पाहिजे आमच्या मुलांना नोकरी, धंदा व शिक्षण, आरोग्याच्या सवलती.तुमची अशी २०१४ सारखी खोटी गॅरंटी नको आहे. आता आम्हाला गरजेची आहे शाश्वती फक्त जगण्याची. या प्रश्नांच्या भडीमाराला चोख उत्तर देणे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांना जड जात आहे.