संभाजी ब्रिगेडचे आंदोलन!
परभणी (Sambhaji Brigade) : लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कारवाई करण्यासाठी परभणीत सोमवार 21 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध आंदोलन (Aandolan) करण्यात आले.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी!
सदर हल्ल्याच्या मागे राजकीय षडयंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्लेखोर मोकाट फिरत आहेत. या संपूर्ण घटनेची सीआयडी (CID) मार्फत चौकशी करावी, सर्व आरोपींना अटक करुन गुन्हे दाखल (Crimes Filed) करावेत, हल्ल्याला पाठीशी घालणार्या राजकीय नेत्यांची चौकशी व्हावी, शेतकरी प्रश्न मांडणार्या संघटनेला संरक्षण द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. कार्यवाही न झाल्यास संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा मंडळ यांच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर गजानन जोगदंड, नितीन देशमुख, बालाजी मोहिते, रामदास आवचार, सुर्यकांत मोगल, गोविंद इक्कर, संदीप गव्हाणे, अमोल अवकाळे, सुरेश लोहट, स्वप्नील गरुड, पांडूरंग शिंदे, रमेश देशमुख, एकनाथ मोरे, विष्णू लोडे, कृष्णा अवकले, विशाल सुर्यवंशी, गणेश चोपडे आदींची नावे आहेत.