Parbhani Accident :- परभणीच्या ताडकळस येथून जवळच असलेल्या फुलकळस येथील तरुण शेतकर्याचा दुचाकी अपघातात (Accident) मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ११ जुलै रोजी रात्री आठ ते नऊ या दरम्यान घडली. मृतकावर फुलकळस येथे अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.
शुक्रवारी रात्री घडली घटना पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे अंत्यसंस्कार…!
सुखानंद मोहनराव सलगर वय ३१ वर्ष, असे मयत शेतकर्याचे नाव आहे. फुलकळस येथील सुखानंद सलगर हे शुक्रवारी दिवसभर शेतात सोयाबीन पिकाची कोळपणी करत होते. काही कामानिमित्त ते दुचाकीवर बसून येथे गेले होते. रात्रीच्या सुमारास फुलकळस पाटी जवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात सुखानंद सलगर यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. शनिवार १२ जुलै रोजी ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. फुलकळस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात आई- वडिल, भाऊ, बहिण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.




