Yawatmal :- जुन्या वादातून २३ वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या(Brutal murder) करण्यात आली. ही घटना शहरातील आंबेडकरनगर पाटीपुरा येथे गुरूवार, १६ ऑक्टोंबरला दुपारी ३.५० वाजता घडली. शहजाद मुज्जफर अली उर्फ बल्ली (२३) रा. रामरहीमनगर, यवतमाळ असे मृतक तरूणाचे नाव आहे.
परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल केले
रामरहीमनगर येथील शहजाद मुज्जफर अली उर्फ बुल्ली याच्यावर गुरूवारी दुपारी आंबेडकरनगर येथे दोन अनोळखी तरूणांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्यासह एलसीबीतील अधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शासकीय रूग्णालय गाठून पाहाणी केली. या प्रकरणी मुख्य आरोपी अमन सैय्यद आरीफ सैय्यद या मुख्य आरोपीला शहर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रदीप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, गौरव ठाकरे, मिलींद दरेकर, अभिषेक वानखेडे, पवन नांदेकर, पीएसआय. सपकाळ, एपीआय सरकटे यांनी ही कारवाई पार पाडली