बासंबा (Youth Accident Died) : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील ट्रॅक्टर अपघातातील २८ वर्षीय तरूण उपचारा दरम्यान नागपूर येथील रूग्णालयात मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (Youth Accident Died) बासंबा या गावातील आशिष भुजंगराव ढाले हा गेल्या ११ जून रोजी आपल्या शेतातून ट्रॅक्टर चालवत येत असताना रस्त्याने त्याचा अपघात झाल्याने त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.
काही दिवस नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असतांना प्रकृति खालावत गेल्यामुळे नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू (Youth Accident Died) झाला असुन त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्याच्या या जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.