बुलढाणा (Prof. Sunil Sapkal) : बुलढाणा शहराचा सामाजिक व सांस्कृतिक चेहरा ठरलेले, सामाजिक कार्याला प्रथम स्थान देत गेल्या दोन दशकापासून कार्यरत शिक्षक सुनील सपकाळ Prof. Sunil Sapkal) यांना तरुणाई फाउंडेशन मेहकरचा कार्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षकी पेशात असूनही सुनील सपकाळ (Prof. Sunil Sapkal) यांनी सामाजिक बांधिलकी सोडली कधी सोडली नाही. मी आणि माझे.. यापलीकडे जाऊन विविध सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. बुलढाणा शहरांमध्ये विविध चळवळी व सामाजिक संघटनांना त्यांचा नेहमीच पाठिंबा राहिला. वेगवेगळ्या संस्था संघटनांशी जवळीक ठेवून शहराचे वातावरण शांततामय व सौहार्य पूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा कायम मोठा वाटा राहिला.
निस्वार्थ राजकारण, निगर्वीपणा, जमिनीवर पाय ठेवून वावरणे, जनसामान्यांचे सुखदुःखाशी घट्ट नाळ यामुळे सुनील सपकाळ (Prof. Sunil Sapkal) यांचा चाहता वर्ग राजकारणा पलीकडे केव्हाच गेला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत तरुणाई फाउंडेशन मेहकरणे त्यांना कार्यगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. लवकरच सदर पुरस्कारचे वितरण बुलढाणा येथे केले जाणार असल्याचे फाउंडेशनने कळविले आहे.