मोरखेड पुलाजवळ सापडला मृतदेह!
पिंजर येथील शोध बचाव पथकाला २४ तासानंतर आले यश
मानोरा (Youth Death) : तालुक्यातील सेवादास नगर येथील युवक मृत्युंजय राजेश राठोड ( वय २३ ) हा दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०,. १५ वाजता अरुणावती नदीवर विसर्जन करताना वाहून गेला, अखेर २४ तासानंतर यवतमाळ जिल्हा दिग्रस तालुक्यातील मोरखेड पुलाजवळ नदीपात्रात त्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.
सविस्तर असे की, गणपती विसर्जनाच्या दिवशी रविवारला अरूणावती नदीवर गणेश विसर्जनासाठी गेलेला मौजे सेवादासनगर येथील युवक राजेश राठोड हा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. रविवारी सायंकाळी पिंजर येथील शोध बचाव पथकाने (Youth Death) युवकाला पाण्यात शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती. परंतु पहिल्या दिवशी तो युवक मिळून आला नाही.
दुसऱ्या दिवशी सोमवारी शोध बचाव पथकाने नदी पात्रात पुन्हा शोधण्यास सुरुवात केली असता २४ तासानंतर ५ . १३ मिनिटानी त्या (Youth Death) युवकाचा मृतदेह मौजे मोरखेड येथील पुलाजवळ नदीपात्रात मिळून आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मृतक युवकांचा शव उत्तरीय तपासणीसाठी दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.