Gadchiroli :- पद्मश्री डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार्या ‘सर्च’ या संस्थेचा ‘निर्माण’ हा युवा विकास उपक्रम २००६ पासून कार्यरत आहे. या अंतर्गत ऑगस्ट महिण्यात चातगांव येथील सर्च संस्थेमध्ये आयोजित शिबीरात देशभरातील युवांनी सहभाग घेतला होता.
पद्मश्री डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या नेतृत्वाखाली २०१६ पासून उपक्रम सुरू
‘निर्माण’च्या १६ व्या बॅचचे शिबीर यावर्षी १२ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडले . देशभरातून तब्बल ४८ युवक व युवती या शिबिरात सहभागी झाले होते. १८ ते २९ वयोगटातील युवकांना लक्ष्य करून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जीवनातील उद्देश शोधणे, भावनिक विकास, सामाजिक प्रश्नांची जाण, गटचर्चा, गटकृती आणि खेळ यांचा समावेश करण्यात आला. त्याच बरोबर उत्कृष्ट लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले सोपान जोशी यांनी ‘उपयोगी गांधी’ या विषयावर आपले मुद्दे मांडले. सोबतच इकोलोजिस्ट आणि फिलॉसॉफिस्ट (Philosopher) मृणालिनी वनारसे आणि फिलॉसॉफिस्ट दीप्ती गंगावणे यांच्यासोबत विज्ञान, तत्वज्ञान आणि कला या विषयावर चर्चासत्र झाले. त्यांनी तीनही विषयांबद्दल खूप सुंदर मांडणी केली.
सर्वांगीण विकास घडवणे हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट
‘निर्माण’ने भारतीय युवकांसाठी विकसित केलेल्या ‘फ्लरिशिंग प्रâेमवर्क’वर आधारित मार्गदर्शन सत्रे देखील या शिबिरात घेण्यात येणार आले. युवकांना अनुभवातून शिकवणे, सामाजिक भान जागृत करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवणे हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आगामी काळात सप्टेंबर (२० ते २५), नोव्हेंबर (०१ ते ०६) आणि डिसेंबर (१४ ते २०) या तारखांना निर्माण शिबीर होणार आहेत. ‘निर्माण’ उपक्रमाशी जोडून घेण्यासाठी व शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी ८७६७६८०५०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.