घटनेने नांदगावपेठ मध्ये हळहळ
नांदगाव पेठ (Youth Suicide Case) : वाळकी रस्त्यालगत असलेल्या बोरनदी धरणात २३ वर्षीय युवकाने उडी घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली.यश कुमोद पांडेय रा. गजानन नगर नांदगाव पेठ असे त्या युवकाचे नाव आहे.सार्वजनिक नवदुर्गा संस्थान येथे पुजारी असलेले कुमोद पांडेय यांचा मुलगा असलेला यश मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घरून जेवण करून बाहेर गेला तो कायमचाच. रात्री पालकांनी शोधाशोध केल्यानंतर धरणाच्या परिसरात (Youth Suicide Case) त्याचे वाहन दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. बुधवारी सकाळी अग्निशमन दलाच्या चमूने रेस्क्यू करून यशचे शव बाहेर काढले.
आत्महत्येचे गूढ अद्यापही गुलदस्त्यातच
घटनेची हकीकत अशी की, मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान यशने आपल्या परिवारासोबत जेवण केले आणि नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी बाहेर गेला. दरम्यान बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने आईने त्यांच्या भ्रमणध्वनी वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने वडिलांनी आजूबाजूला तसेच मित्रांना फोन करून शहानिशा केली. न राहवून त्यांनी व यश च्या मित्रांनी महामार्गाने व धरणाच्या रस्त्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान यशचा (Youth Suicide Case) मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला.
घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना देण्यात आली. मात्र अंधार असल्याने त्याठिकाणी रेस्क्यू करणे कठीण असल्याने बुधवारी सकाळी ९ वाजताच्या अग्निशमन पथकाच्या चमूने यश चे शव बाहेर काढले व रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. यशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवलेली होती. मात्र त्यामध्ये आत्महत्या करण्यासंदर्भात ठोस कारण नमूद नव्हते. मात्र स्वतः काही लोकांचे व मित्रांचे उधार पैसे घेतले होते ते आपण त्यांना परत करावे, असा उल्लेख त्यामध्ये होता. अद्याप (Youth Suicide Case) आत्महत्येचे गूढ गुलदस्त्यात असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे करत आहेत.
उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनानंतर यशचा मृतदेह (Youth Suicide Case) पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. दुपारी दीड वाजता येथील मोक्षधाम मध्ये यशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.