Yawatmal :- नियोजित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पांच्या विरोधासाठी सुरुवातीला हिमायतनगर तालुक्यात दोन ठिकाणी महाएल्गार सभा झाल्या होत्या. सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. उमरखेड तालुक्यातील चातारी येथे १४ सप्टेंबर रोजीच्या महा -जन आक्रोश सभेस वरुन परत येणार्या हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथील एका युवकाने हरडप येथील बंधार्यात उडी मारुन आत्महत्या(Suicide) केल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार च्या सुमारास घडली. धरणाला विरोध करणार्या पहिल्या युवकाचे बलिदान असल्याचा सुर पैनगंगा नदीच्या (Painganga River) काठावरील गावातून ऐकावयास मिळत आहे.
पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली
विरसनी येथील राजेंद्र पांडुरंग महाजन (२५) हा युवक सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पांच्या (Hydroelectric projects) विरोधाच्या चातारी येथील महा – जन आक्रोश सभेस ईतरा सोबत सहभागी झाला होता. सभा संपल्यावर चातारी हरडप कामारी मार्गे विरसनी येत असताना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास हरडपच्या बंधार्यावर ऊडी घेऊन आत्महत्या केली. सहस्रकुड प्रकल्प झाला तर लहानपणापासून कुडाचे घर निघुन चांगले घर बांधले ते गेल्यावर पुन्हा घर होईल का, पत्नी मिळेल का या विवंचनेत सदर युवकांनी धरणाच्या विरोधात पहिले बलिदान देणारा ठरला असल्याची चर्चा आहे. सत्य काय हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. सध्या पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची (sudden death)नोंद केली आहे.