पैठण तालुक्यातील हिरडपुरी युवा मंचच्या मशाल यात्रेचा स्तुत्य उपक्रम
रिसोड (Yuva Manch Mashal Yatra) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथिल युवकांची पायंदळी मशाल यात्रा हि प्रत्येक वर्षाला काढण्यात येते.यंदा रेणुका मातेच्या पावनस्पर्शा समृध्द झालेले माहुरगड ते पैठण मशाल यात्रा (Yuva Manch Mashal Yatra) ही निघाली आसुन सुमारे चारशे किमी.अंतर पेटती मशाल हाता मध्ये घेऊन पायंदळी यात्रेला प्रारंभ झालेला आहे.यात्रे करूनचे स्वागत भर जहागीर येथे करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संत एकनाथ महाराज यांच्या समधीचे दर्शन घेऊन हिरडपुरी येथील सुमारे 22 युवक रेणुका मातासंस्थान माहुरगड येथुन पैठण कडे निघाले आहेत.या पेटत्या मशाल यात्रेचा (Yuva Manch Mashal Yatra) संकल्प हा प्रत्येक सजिव जिव हा सतत हर्ष उल्लासात राहावा,सर्वत्र शांतता राहावे प्रत्येकाने आपसातील आपले संबंध गुण्यगोविंदाचे ठेवण्यासाठीच ही मशाल यात्रा प्रत्येक वर्षाला हिरडपुरी येथिल युवक काढतात आणि या युवकांना मोठ्या प्रमाणात कौटुंबिक आधार सुध्दा मिळतो हे विशेष.
हिरडपुरी येथिल युवकांनी आता पर्यंत हिरडपुरी ते मोहटादेवी, तुळजापुर, कोल्हापुर, सप्तश्रृंगी, वणी, आशा प्रकारे आता पर्यंत नव मशाल यात्रा काढण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक शक्ती पिठा वरून ही मशाल यात्रा (Yuva Manch Mashal Yatra) पैठण येथे एकनाथ महाराज मंदिरा मध्ये समाप्त होते.या मशाल यात्रे मध्ये एकुण 22 युवक आसुन प्रत्येक दिवशी सुमारे शंभर किलोमीटर चा पायंदळी प्रवास आळीपाळीने पार करण्यात येत आहे.