पशु व्यवहारात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!
परभणी (Qureshi Society) : जमियत उल कुरेश समाज विकास मंडळ परभणी तर्फे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार 31 जुलै रोजी मुकमोर्चा काढण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Dharna Aandolan) करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त यांना सादर करण्यात आले.
जिल्ह्यातील गोशाळांचे लेखा परीक्षण करुन त्यांची तपासणी करावी!
परभणी शहरातील खाटीक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरीत नुतणीकरण करुन देण्यात यावेत, धार रोड परभणी येथील कत्तलखाना (Slaughterhouse) अद्यावत करुन देण्यात यावा, तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) यांची व्यवस्था करावी, कत्तलखाना येथे मांस कापल्यानंतर ते विक्री करण्यासाठी आणखी 2 नवीन मार्केट बांधून द्यावेत, गैरकायदेशीर व असंवैधानिक गोरक्षकांच्या अन्याय व अत्याचारा पासून, मॉबलिचिंग पासून कुरेशी सुमुदायाचे रक्षण करुन गोरक्षकांविरुध्द कायदेशीर कारवाई (Legal Action) करुन त्यांच्यावर फौजदार खटले भरण्यात यावेत. परभणी जिल्ह्यातील गोशाळांचे लेखा परीक्षण करुन त्यांची तपासणी करावी, संपूर्ण कुरेशी समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलन कर्त्यांनी प्रशासनाला (Administration) निवेदन सादर केले. निवेदनावर मो. अकबर कुरेशी, अब्दुल खालेद सौदागर, हाती अब्दुल कलिम, अब्दुल रज्जाक कुरेशी, हाजी अब्दुल करीम, मोहम्मद इस्माईल कुरेशी, अब्दुल समद कुरेशी, मोहम्मद रफिक कुरेशी, हाजी मोबीन, अॅड. इम्तियाज खान, मोहम्मद गौस झैन, सय्यद अब्दुल खादर, रवि सोनकांबळे, शेख अहेमद, हाफेज मोहतसीम, जाकेर लाला, अलिम खान, जलील खान, फारुख बाबा, आशिष वाकोडे, शकिल मोहियोद्दीन, सलिम कच्छी, पाशा कुरेशी, कलिम अन्सारी, बदर चाऊस, हाफिज रहेमान, हाफिज रईस, नदीम खान, हाफेज नुरी, गुलाम रब्बाणी, शेख फहाद, अहेमद खान आदींच्या स्वाक्षर्या आहेत.