Mahagaon :- काळी टेंभी येथील दुर्गादेवी विसर्जन करतांना ४ ऑक्टोबर रोजी शनिवारी सायंकाळी ग्राम रोजगार सेवक गणेश हौसाजी सुकळकर हे वरुडी येथील पैनगंगा नदीपात्रात विसर्जन करण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरल्याने ते खोल पाण्यात गेले. नदी पात्रातील पान्याचा प्रवाह जास्त प्रमाणात वाढुन असल्याने गणेश सुकळकर यांचा शोध लागला नव्हता. एन डी आर एफच्या(NDRF) जवानांकडून शनिवार रात्री पासून ते दुसर्या दिवसापर्यंत शोध मोहीम सुरूच होती.
एन डी आर एफच्या जवानांकडून शनिवार रात्री पासून ते दुसर्या दिवसापर्यंत शोध मोहीम सुरूच
महागांव तहसील प्रशासनाच्या वतीने व एन डी आर एफच्या जवानांकडून अथक प्रयत्न करूनही सुध्दा वाहुन गेलेल्या गणेश सुकळकर यांचा शोध लागला नव्हता. शेकडो आप्तस्वकीय सुध्दा अहोरात्र गणेश सुकळकर यांचा शोध घेत होते. मात्र अखेर सोमवारी दिनांक ६ आकटोबंर रोजी सकाळी साडे सहा वाजता दरम्यान गणेश सुकळकर यांचा मृतदेह धनोडा येथील पैनगंगा नदीपात्रातील पुलाखाली आढळून आल्याची माहिती एका इसमाने महागांव तहसीलदारांना दीली. या वेळी तहसील प्रशासनाने तात्काळ धनोडा येथे धाव घेऊन मृतदेह (dead body) शवविछेदनासाठी (Autopsy) पाठविण्यात आला. मृतक गणेश सुकळकर यांच्या पाटीमागे मोठा आप्त परिवार असुन घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.