बार्शीटाकळी (Creative School Award) : बार्शी टाकळी तालुक्यातील आळंदा गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माध्यमिक विभाग अकोला जिल्ह्याच्या वतीने सन 2025 घ्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा गावात (Creative School Award) जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा असून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणारे एक आदर्श शाळा आहे. या गावातील ग्राम मंडळाचे अध्यक्ष तथा सरपंच माजी सैनिक दत्ता पाटील ढोरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला पाणी कर व घर कव्हर माफ करण्याचा ऐति नाशिक निर्णय काही दिवसापूर्वी घेतला होता.
सदर शाळेत वर्षभर विविध प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. विद्यमान मुख्याध्यापक मनोज जयस्वाल व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामाप्रमाणेच इतरही विविध चांगले उपक्रम राबवित असल्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माध्यमिक विभाग अकोला चे जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक १४ सप्टेंबरला सन्मानित केले. असल्याची माहिती ग्राम मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील ढोरे यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली.
विशेष म्हणजे यापूर्वी सदर शाळेचे श्रीमान आडे हे मुख्याध्यापक आसताना आदर्श शाळेचा तसेच मुख्याध्यापक मनोज जयस्वाल यांच्या कार्यकाळात पटसंख्या वाढीचा शासनाकडून पुरस्कार मिळाला आहे. (Creative School Award) शाळेतील शिक्षक गण, शाळा समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, ग्राम मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच गावातील जनतेच्या प्रेमामुळेच चांगले उपक्रम शाळेत राबविण्यात येत असल्याचे मत मनोज जयस्वाल यांनी व्यक्त केले.