वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत, प्रस्ताव पाठवला परंतु मंजुरी मिळाली नाही
आदिवासी बहुल क्षेत्रातील शाळांचा समावेश
सुधिर गोमासे
तुमसर (Zilla Parishad School) : सध्या पावसाळा असून बहुतांश शाळेच्या इमारती जीर्ण असल्याच्या पोल खोलतात. अशाच तालुक्यातील काही शाळेत वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत असून काही ठिकाणी स्लॅब कोसळले आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु विद्यार्थी जीव मोठे घेऊन शिक्षण घेत आहे. या (Zilla Parishad School) वर्गखोल्या सुधारण्यासाठी प्रस्ताव पाठविला असून तो धुळखात आहे. अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद माध्यमिक व पूर्व माध्यमिक शाळेत (Zilla Parishad School) ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घ्यायला जातात. परंतु ज्या वर्गात बसून शिकत आहेत त्या वर्गखोल्या जीर्ण झाले असून त्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. तुमसर तालुक्यातील सुकडी (देव्हाडी) येथील दोन वर्ग खोल्या लोहारा (गायमुख) एक वर्ग खोली, लेंडेझरी तीन वर्गखोली, पिटेसूर दोन वर्ग खोली, रोंघा दोन वर्गखोली नाकाडोंगरी दोन वर्ग खोली अशा अनेक तालुक्यातील शाळेतील वर्गखोल्या च्या समावेश आहे.
सदर जीर्ण अवस्थेत असलेल्या वर्गखोल्या सुधारित करण्यासाठी वारंवार प्रस्ताव पाठविण्यात आला परंतु शासनाकडे तो प्रस्ताव धूळखात असून अद्याप तो मार्गी लागलेल्या नाही व कुठलीही मंजुरी देण्यात आली नाही. कदाचित शासन मोठा अपघात होण्याची वाट पाहत असेल असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये शिक्षण डिजिटल करण्यासाठी शासन लाखो करोड रुपये खर्च करीत आहे. परंतु तसे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यामागे कारण म्हणजे की (Zilla Parishad School) शाळेतील वातावरण व वर्ग खोल्या ह्या शिक्षणासाठी अनुकूल नाही.
तुमसर तालुक्यातील काही भाग हा आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे त्या क्षेत्रात शाळेतील इमारती जुन्या असून त्या कॉलम नसलेल्या आहेत. त्यामुळे सतत पावसामुळे ह्या वर्ग खोल्यातील इमारती कधीपण पडू शकतात. असाच प्रकार सुकळी व लेंडे झरी येथील शाळेमध्ये घडला वर्गात कोणी नसतांनी स्लॅब कोसळल्याने सरळतो शिक्षकाच्या टेबलवर पडला सुदैवाने शिक्षक व विद्यार्थी बचावले. परंतु असे किती दिवस चालणार कुठेतरी या सर्व गोष्टीला विराम लागायला पाहिजे आणि ज्या (Zilla Parishad School) शाळेतील जीर्ण इमारती असतील त्यांना सुधारित करून एक चांगली सोयी सुविधा सुशोभित शाळा शासनाने तयार केली पाहिजे.
सध्या तालुक्यातील ज्या जीर्ण अवस्थेत असलेल्या (Zilla Parishad School) शाळेतील वर्ग खोल्या आहेत, त्या सुधारित करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु शासनाकडून कुठलीही मंजुरी आले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी शिकवल्या जात आहे.
-अर्चना माटे, गटशिक्षणाधिकारी तुमसर पंचायत समिती
गेल्या काही दिवसापासून लेंडेझरी हे गाव आदिवासी क्षेत्रात असल्यामुळे कुठल्या पण लोक प्रतिनिधींनी जीर्ण अवस्थेत असलेल्या वर्ग खोल्यांकडे लक्ष दिले नाही. आम्ही स्वतः जिल्हा परिषदमध्ये (Zilla Parishad School) जाऊन नवीन वर्ग खुल्या तयार करण्यात यावा याकरिता प्रस्ताव पाठविला अद्याप त्याला दुर्लक्ष करण्यात येत आहे.
-रोशन सावतवान, उपसरपंच लेंडेझरी ग्रामपंचायत




