देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: ‘जिंकल्यात जमा’?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > अग्रलेख > ‘जिंकल्यात जमा’?
संपादकीयअग्रलेख

‘जिंकल्यात जमा’?

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 12:25 PM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

दोनेक महिन्यांपूर्वी निवडणुकोत्सवाला सुरुवात झाली. २०२४ सालच्या निवडणुकीचा निकाल लागल्यात जमा आहे, अशी तेव्हा ‘हवा’ होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भाजपला हमखास जिंकून देणारे ‘हुकमी एक्का’. अजेंडा प्रस्थापित करणे, आपले म्हणणे सफाईदारपणे लोकांच्या गळी उतरवणे, आणि हा-हा म्हणता देशाचा मूड आपल्या बाजूला वळवून घेणे, हे त्यांचे हातखंडा काम. त्यांना त्यांचे हे हातखंडा काम नीट पार पाडता यावे, म्हणूनच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे हे असे लांबलचक वेळापत्रक आखले आहे, असे बोलले जाऊ लागले. २०१४ पासून एखाद्या व्यक्तीमध्ये ‘करिष्मा’ ऊर्फ जादू अशी आहे, की ती व्यक्ती प्रचारसभांमध्ये जे बोलते, तसेच घडते, आणि अनेकदा झालेही तसेच. ‘अब की बार मोदी सरकार’, ‘अब की बार, तीनसो पार..!’, तसेच गेल्या दहा वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीचे ‘ओपिनियन पोल’सुद्धा मोदींच्याच बाजूने आणि निकाल लागल्यानंतर ते जवळपास खरेही ठरलेले सबंध देशाने पाहिले आहेत. व्यक्तिमत्त्वातला करिष्मा ऊर्फ जादू कुणातही असू शकते. एखादा संत वा धार्मिक व्यक्ती असेल, एखादी चित्रपटतारका असेल, एखादी गायिका असेल, एखादा खेळाडू असेल वा एखादा राजकारणीही असेल.

मोदींमध्ये तो निश्चितच आहे. अर्थात, मोदींच्या भक्तांचा पंथ अजूनही अस्तित्वात आहे, हे नाकारता येणार नाही. राजावर निर्विवाद निष्ठा असलेल्या श्रद्धाळू लोकांचा जथ्था म्हणजे हा ‘भक्तपंथ’. भक्तांच्या मते सरकारकडून कुठलीही चूक होणे शक्यच नाही आणि यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बेकायदेशीर ठरवलेल्या ‘निवडणूक रोखे’ योजनेच्या बचावाला धावून येणे, ही सरकारची एक चूक. त्यामुळे त्यांची प्रतिमा एकाएकी ‘न्यायव्यवस्थेला धूप न घालणारा पंतप्रधान’, अशी होऊन बसली. कधी नव्हे, ती ‘चंदा दो, धंदा लो’ ही काँग्रेसने दिलेली घोषणा अचूक शरसंधान करून केली. हे पुरेसे नव्हते म्हणून की काय, अरविंद केजरीवाल यांना अटक करून मोदींनी स्वतःच्या अडचणींमध्ये भरच घातली. ही अटक निव्वळ सूडभावनेने केली जात असल्याचे चित्र तयार झाले. पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या तीनही राज्यांत भाजपाच्या विरोधात वातावरण गेले आहे. पक्षात आलेल्या इतरांच्या बाबतीत आणि पक्षात न आलेल्यांच्या बाबतीत वेगवेगळा न्याय, यावरून ‘वॉशिंग मशीन’ ही भाजपला काँग्रेसने उपरोधाने बहाल केलेली उपाधी अनेकांना चपखल वाटू लागली.

दुसर्‍या बाजूला ‘२०२४ची निवडणूक आम्ही जिंकल्यात जमा आहे’ या मोदींच्या प्रचाराला विरोधी पक्ष जुमानेनासा झाला. उलट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रतिस्पर्धी मोदींनी दिलेल्या आणि न पाळलेल्या वचनांबद्दल मोदींना जाब विचारू लागले. त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीची कसून चिकित्सा होऊ लागली. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे की, डाळ, खाद्यतेल आणि भाज्या यांच्या उत्पादनात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवून ‘गरीब की थाली को सुरक्षित’ करण्याचा प्रयत्न केला जाईल. डाळ आणि भाज्या, हे पदार्थ खनिज तेलासारखे पृथ्वीच्या पोटात तयार होतात की, समुद्राच्या? ती जर शेती पिके असतील, तर मग महाराष्ट्र ते पंजाब-हरयाणा, व्हाया गुजरातपर्यंतचे शेतकरी गेल्या दहा वर्षांत सातत्याने हमीभावासाठी, आरक्षणासाठी, आपल्या मागण्यांसाठी रस्त्यांवर का उतरत आहेत? त्यांच्या शेतात डाळी आणि भाज्या पिकवल्या जात नाहीत का? इ. प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचा दावा मोदींनी आपल्या पहिल्या कार्यकाळातच केला होता; पण प्रत्यक्षात दरवर्षी एक कोटीसुद्धा रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. त्यात नोटबंदी आणि कोरोनाकाळ यांमुळे बेरोजगारांच्या संख्येत अजूनच भर पडली आहे. या सगळ्यांवरून जनमानसामधला असंतोष, खदखद, आणि संताप या सार्‍याला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वाचा फुटली आहे. ‘जिंकल्यात जमा’ प्रकारची भाकिते करणारे रणनीतिज्ञ तूर्तास जात्यधारित समीकरणांची जुनीच जुळवणी करण्यात मग्न आहेत, तसेच पुन्हा एकदा त्याच त्या शिळ्या ‘हिंदू-मुस्लीम’ कढीला ऊत आणण्यापुरते उरले आहेत. देहाने दमले-भागलेले तर ते आहेतच; पण त्यांचा राजकीय संदेशही प्रभावहीन भासतो आहे.

You Might Also Like

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

Ganesh Chaturthi: गणपतीला ‘विघ्नराज’ का म्हणतात? ‘ही’ पौराणिक कथा जाणून घ्या!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli: भानामतीच्या आरोपावरून पाच जणांना मारहाण;आठ जणांवर गुन्हा दाखल

Deshonnati Digital Deshonnati Digital October 29, 2024
Chhatrapati Sambhaji Nagar : नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दल अलर्ट मोडवर
Gadchiroli: बापरे! याठिकाणी सापडले 9 आईडी बॉम्ब व 3 क्लेमोर पाईप
LPG गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणार; शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध
Dhangar Samaj Rasta Roko: धनगर समाजाच्या वतीने 2 तास रास्ता रोको आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Supreme Court CJ B. R. Gawai
Breaking Newsदेशप्रहारमहाराष्ट्रसंपादकीय

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

October 12, 2025
Jolly LLB 3 And Farmer
मनोरंजनप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

September 28, 2025
Farmer Loan Waiver
Breaking Newsप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

September 22, 2025
Prakash Pohare
विदर्भअकोलामहाराष्ट्रलेखशेतीसंपादकीय

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

September 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?