थोर पुरुषांनी सर्वस्वांचा त्याग करून या भारत मातेला परक्यांच्या जोखडातून मुक्त केले!
मानोरा (Independence Day) : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वतंत्र्यवीरांनी आपले बलिदान दिले, अनेक थोर पुरुषांनी सर्वस्वांचा त्याग करून या भारत मातेला परक्यांच्या जोखडातून मुक्त केले, त्यामुळे आपल्याला मिळालेले, स्वतंत्र हे अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातून, अनेक थोर पुरुषांच्या त्यागातून मिळालेले आहे. याची जाणीव आजच्या युवकांनी ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेचे (Educational Dissemination Institute) अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी केले.
रांगोळी स्पर्धा व मेहंदी स्पर्धेचे आयोजन!
स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे, संस्थेचे संचालक सर्वश्री सुरेशराव गावंडे, ज्ञानदेवराव भोयर, पुरुषोत्तम पाटील, प्रकाश इंगोले, डॉ. ओंकार राठोड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक पर मार्गदर्शनातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमासह, संस्थेच्या मार्गदर्शनात महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात कशी प्रगती करत आहे, हे सविस्तरपणे विशद केले. स्व. राजाराम बापूराव जतकर ग्रंथपाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांचे स्मृती प्रित्यर्थ छाया जतकर यांचे तर्फे महाविद्यालयातील ग्रंथालयाला पुस्तके घेण्यासाठी 21 हजार रुपयाचा धनादेश प्राचार्य डॉ ठाकरे यांनी संस्थेचे अध्यक्ष यांचे कडे सुपूर्द केला. महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी विजय भगत यांनी सुद्धा 50 हजार रुपयाची पुस्तके महाविद्यालयातील ग्रंथालयाला भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य एन एस ठाकरे यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार महाविद्यालयातील मुलीला देण्याचे ठरले, त्यानुसार कु. मोनिका निरंजन राऊत या विद्यार्थिनीला मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन तिचा या पुरस्काराने सत्कार करण्यात आला. इयत्ता बारावी विज्ञानचा विद्यार्थी सुरज झळके याचासुद्धा ऑनलाइन टेस्ट साठी उपयुक्त असणारे ॲप विकसित केल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीच्या वतीने रांगोळी स्पर्धा व मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्हीही स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शारीरिक क्षण विभाग प्रमुख प्रा गजानन पाटील यांनी केले. स्वतंत्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण (Flag Hoisting) कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.