सिरसम बु. (Sirsam Farm Road) : हिंगोली तालुक्यातील सिरसम बु. येचील शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता हा मागील दोन वर्षापासून बंद अवस्थेत होता. काही शेतकऱ्याऱ्यांनी या रस्त्याला विरोध केला होता. (Sirsam Farm Road) शेतकऱ्यांना शेतातील माल घरी आणण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे ललागत होते. परंतु तहसीलदार श्रीकांत भुजबळ व मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जून रोजी पोलिस बंदोबस्तात शेतात जाणारा रस्ता दोन वर्षानंतर मोकळा करण्यात आला.
सिरसम बु, येथील गट क्रमांक २७९ ते गट क्रमाक १८२ या गटातून शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्त्याविषयी अनेक तक्रारी तहसील प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शेतातील रस्ता हा मागील दोन वर्षापासून रखडल्याने शेतात जाणाऱ्या (Sirsam Farm Road) शेतकयांना शेतातून माल घरी आणण्याकरीता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच पेरणीच्या वेळी खत, बियाणे व ट्रॅक्टर, पेरणी यंत्र ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. परंतु वारंवार महसूल प्रशासनातील अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्नही केले होते.
परंतु याला यश आले नव्हते. हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल यांच्या मार्गदर्शनाखाली सिरसम बु. येथील गट क्रमांक २७९ ते गट क्रमाक १८२ पर्यंत तकारी रस्ता सात फुटाच्या हद्दी व खुला करून पोलिस बंदोबस्त रस्ता मोकळा करून दिला आहे. यावेळी सिरसम बु. येथील संतोष इंगळे, जगन इंगळे यांच्या शेताचा रस्ता मोकळा करून दिला असल्याचे अधिकाऱ्यांनी दुरध्वनीद्वारे सदरील शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
मागील दोन वर्षापासून रखडलेल्या शेतातील रस्ता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मोकळा करून दिल्याने शेतकऱ्याची वा रस्त्यामुळे ये-जा करण्यासाठी सोच होणार आहे. यावेळी मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल, मोजणी निरीक्षक सय्यद कलीम, ग्राममहसूल अधिकारी नुसणे, पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे यांच्यासह बासंबा येथील महसूल सेवक संतोष मानमोठे व गावातील सरपंच, प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते.