पूर पीडितांना दिवाळी पुर्वी नुकसान भरपाई द्यावी!
मानोरा (Heavy Rain) : तालुक्यातील उमरी बु. मंडळातील पोहरादेवी व इतर अतिवृष्टी (Heavy Rain) बाधीत पूर पिडीत ग्रस्तांना दिवाळीपूर्वी घर पडझड व नुकसान झालेल्या अन्नधान्य संसार उपयोगी वस्तूंची भरपाई द्यावी, अन्यथा दि. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काळी दिवाळी साजरी करण्यासाठी आमरण उपोषण (Fasting to Death) करणार, असे इशाऱ्याचे निवेदन विजय पाटील यांच्या सह इतरांनी दिले आहे.
तहसीलदार यांना निवेदन!
उमरी बु मंडळातील पोहरादेवी सह इतर गावात दि. २९ ऑगस्ट, २ सप्टेंबर व २७ २७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने अनेक घरांची पडझड व अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. याबाबत तलाठी, ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु त्याचा अहवाल संबंधितांनी महसूल विभागाकडे सादर न केल्यामुळे अद्यापही पूर पिडीत नागरिकांना (Citizens) अद्यापही खावटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत आपणास कळवून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पर्यंत पूर ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आमरण उपोषण तहसिल कचेरीवर करणार असल्याचे निवेदन दिले आहे.