वर्तवणुकीत सुधारणा झालेल्यांना मिळणार रोजगार
यवतमाळ (Yavatmal Crimes) : अभिलेखावर असलेले हिस्ट्रीशीटर, निगराणी बदमाश तसेच दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे शिरावर असलेले गुन्हेगार यांचे मानसिकतेते बदत व्हावा व त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करता यावे, याकरीता शनिवारी पोलीस अधीक्षक कुमार चिता यांनी एक आगळी वेगळी मोहीम हाती घेतली.
त्याअंर्गत उपविभाग स्तरावर प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी यांना त्यांचे कार्यालयात त्याच प्रमाणे जिल्हा स्तरावर यवतमाळ उपविभागातील सर्व पोलीस ठाणे यांना पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे (Yavatmal Crimes) पोलीस ठाण्याचे अभिलेखावर असलेले हिस्ट्रीशीटर, निगराणी बदमाश व दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे नोंद असणारे सराईत गुन्हेगार यांना एकत्र आणून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करणे करीता समुपदेशन कावे व ज्यांना प्रामाणिकपणे रोजगाराची संधी हवी आहे अशा गुन्हेगारांना ऑपरेशन प्रस्तान अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करुन देता यावी याकरीता पोलीस अधीक्षक कुमार चिता यांनी ही आगळी वेगळी मोहीम राबविण्याचे आदेश दिले.
यवतमाळ उपविभागातील ८७, पुसद उपविभागातील ५७, दारव्हा उपविभागातील ४२. वणी उपविभागातील २६. पांढरकवडा उपविभागातील २५ आणि उमरखेड उपविभागातील ४३ अशा एकुण २७९ हिस्ट्रीशीटर व निगराणी बदमाशांची झाडाझडती पोलीसांकडुन घेण्यात आली. (Yavatmal Crimes) गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळु नये व प्राणीकतेची कास धरुन स्वतः बरोबर समाजाचे विकासात हातभार लावावा याकरीता त्यांचेकडून प्रतिज्ञा वदवून घेण्यात आली.