देशोन्नतीच्या बातम्या विकासाला चालना!
बार्शीटाकळी (Representative’s Glory) : दैनिक देशोन्नतीच्या अंकात, ग्राम मंडळाचा कायदा उचला जनतेच्या जीवावर, या संदर्भात राज्यात सर्वप्रथम बातमी प्रकाशित केली होती. याबाबत आमदार रणधीर सावरकर (MLA Randhir Savarkar) व हरीश पिंपळे यांनी राज्याच्या विधानसभा गृहात सविस्तर चर्चा केल्यानंतर, राज्यातील एकोणीस गावातील ग्राम मंडळातील जनतेलायाचा लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच ‘जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास गर्व पाणी तर माफ होणार, अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित झाल्याने गावच्या विकासाला (Village Development) चालना मिळाल्याने, देशोन्नतीच्या प्रतिनिधीचा खासदार व आमदारांनी गौरव केला आहे.
गावातील जनतेकरिता देशोन्नतीचे योगदान!
बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा व रूस्तमाबाद गावातील जनतेने दिनांक एक जूनला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यांच्या300 या जयंती व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व गुणवंताचा सत्कार असा कार्यक्रम खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली श्री खंडेरायाच्या मंदिराच्या आवारात आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात दैनिक देशोन्नतीच्या अंकात ‘ग्राम मंडळाचा कायदा जनतेच्या कशा प्रकारे विरोधात आहे, या संदर्भात वेळोवेळी सत्यनिष्ठ वृत्त मालिका तथा बातम्या प्रकाशित केल्या होत्या. तसेच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्यास पाणीकर व घर पर माफ होणार, ‘अशा प्रकारची बातमी राज्यात सर्वप्रथम प्रकाशित केली होती. त्यामुळे गावातील जनता करिता देशोन्नतीचे योगदान आहे, त्यामुळे दैनिक देशोन्नती (Deshonnati) बार्शी टाकळीचे तालुका प्रतिनिधी दत्तात्रय भटकर (Taluka Representative Dattatraya Bhatkar) यांचा अकोल्याचे खासदार अनुप संजय जीधोत्रे, व आमदार हरीश पिंपळे यांनी शेला, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरव यावेळी व्यासपीठावर अकोल्याच्या प्रथम महापौर सुमनताई गावंडे, विधानसभा प्रमुख तथा माजी सभापती राजु पाटील काकड, छावाचे जिल्हाध्यक्ष शंकर वाकोडे, ज्ञानेश्वर सुलताने, तालुका अध्यक्ष गोपाल महल्ले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी केशवराव पातोंड, श्रीराम गावंडे, योगेश कुंदनकर, रामधन गाडगे, पिंटू पाटील, ग्राम मंडळ आळंदाचे अध्यक्ष दत्ता ढोरे, ग्रामपंचायत रुस्तमाबादचे सरपंच तथा माजी उपसभापती गजानन म्हैसने, पोलीस पाटील सुनील खाडे, मुख्याध्यापक मनोज जयस्वाल सर असे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन श्री नागेसर तर आभार प्रदर्शन नागोराव ढोरे यांनी केले. विशेष म्हणजे दैनिक देशोन्नतीच्या वर्धापन दिनात, देशोन्नतीचे संपादक कथा मालक प्रकाश भाऊ पोहरे यांचे हस्ते श्री भटकर यांना ‘संपादकीय पुरस्कार’ यापूर्वी मिळाला आहे.