Ralegaon :- राळेगांव नागपूर कडून लगतच्या तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जाणार्या तब्बल ५५ म्हशीच्या बछड्यांची (Buffalo calves) वडकी पोलिसांनी सुटका करून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.हि कारवाई ७ जुलै रोजी रात्री दिड वाजताचे दरम्यान वडकी पोलीस ठाण्याच्या (Police station) हद्दीतील देवधरी घाटात केली असून या कारवाईत पोलिसांनी जवळपास २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहेत.
वडकी पोलिसांच्या कारवाईत जवळपास २७ लाखांचा मुद्देमाल
नागपूर वरुन अदीलाबाद येथे एका कंटेनर द्वारे बेकायदा गोवंशाची तस्करी होत असल्याची खात्री लायक माहिती वडकी पोलिसांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवधरी घाटात सापळा रचला.दरम्यान खबर्याने दिलेल्या वर्णनाच्या एच.आर.६७ सी .२००५ या क्रमांकाच्या कंटेनरची पोलिसांनी तपासणी केली असता त्या कंटेनर मध्ये ५५ नग म्हशींचे बछडे आढळून आले. या प्रकरणी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला.हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलिसांनी पार पाडली.