सुधिर गोमासे
तुमसर (Bawanthadi Dam) : तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सीतेकसा येथे बावनथडी नदीवर धरण बांधण्यात आले आहे.आंतरराज्यीय धरण असुन महाराष्ट्र -मध्यप्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. सदर प्रकल्पाचा पाया गेल्या चाळीस वर्षांपूर्वी रोवला गेला आहे. दोन्ही राज्यांतील शेतकर्यांना या (Bawanthadi Dam) धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असतो. सदर बावनथडी पाणलोट क्षेत्रात ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबर च्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली असल्याने धरण सप्टेंबरच्या सुरुवातीस पूर्णपणे भरले नसले तरी केवळ ६० टक्के भरले आहे.
तर गतवर्षी सदर धरण सप्टेंबर महिन्यात ८५ टक्के भरले होते. त्याच्या आधल्या वर्षी शंभर टक्के भरले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत धरण कमी भरले आहे. परंतु सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस पडला तर धरण शंभर टक्के जवळपास भरण्याची शक्यता आहे. (Bawanthadi Dam) धरण शंभर टक्के भरले तर तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांना आगामी रब्बी हंगामात शेती सिंचनासाठी पाणी मिळेल नाहीतर मिळण्याची शक्यता कमी असणार आहे.
बावनथडी धरण सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तुडूंब भरले तर याचा फायदा मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांना खरीप व आगामी उन्हाळी रब्बी पिकांच्या शेती सिंचनासाठी होणार आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकर्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यावर्षीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्याने हा प्रकल्प केवळ ६० टक्के भरला आहे.
यापूर्वी बावनथडी प्रकल्पातून खरीप व रब्बी हंगामात धान पिकांसाठी कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान साडे पाच हजार हेक्टर शेतजमीन सिंचित झाली होती. यंदाच्या खरीप हंगामात (Bawanthadi Dam) बावनथडी प्रकल्पाचे पाणी धानपिकाच्या सिंचनासाठी मिळवण्याची शक्यता असली तरी आगामी रब्बी हंगाम मात्र धरणातील जलसाठ्यावर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे हजारो हेक्टर शेती बावनथडी धरणांच्या पाण्याने शेती सिंचित होत असले तरी मात्र येथिल शेतकरी पाणी करपट्टी देण्यास असमर्थता दर्शवत आहेत. परिणामी आगामी काळात शेती सिंचनाचा प्रश्न उभा ठाकणार आहे.
पाणी विसर्गाची जबाबदारी मध्यप्रदेशाकडे
आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाच्या पाया गेल्या ४० वषापूर्वी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने तुमसर तालुक्यातील सीतेकसा येथे रोवला आहे. मध्यप्रदेशासह – महाराष्ट्रातील तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांना सुजलाम्-सुफलम् करुन सिंचनासाठी वरदान ठरणार्या (Bawanthadi Dam) बावनथडी धरणाच्या पाण्यावर नियंत्रण मध्यप्रदेश शासनाचे आहे.व पाणी विसर्ग करण्याचा निर्णय सुध्दा मध्य प्रदेश शासन घेत असते. मध्यप्रदेश शासनाने निर्णय घेतल्या नंतरच महाराष्ट्रात शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळत असते.
पाणी पट्टी कर मागणी चार कोटी, वसुली मात्र १५ लक्ष
तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांना सुजलाम् सुफलम् करणार्यांना (Bawanthadi Dam) बावनथडी धरणांच्या पाण्याने ७६ गावातील सतरा हजार हेक्टर शेतजमीन सिंचित होत असते. सदर शेतजमीन बावनथडी धरणांच्या पाण्याने शेती सिंचित होत असली तरी वर्षाकाठी शेतकर्यांकडे चार कोटी ची पाणी पट्टी कर मागणी असते परंतु येथे पाणीपट्टी कर वसुली केवळ दहा ते पंधरा लक्ष जमा होत असते व कोट्यवधी रुपयांची थकबाकी शेतकर्यांवर आहे. परिणामी येथील कर्मचार्यांचे वेतन व कालवे दूरूस्तीचे काम रखडले असल्याची माहिती आहे.
थकीत शेतकर्यांच्या सातबारावर बोजा चढविण्याची कारवाई!
तुमसर-मोहाडी तालुक्यातील सतरा हजार हेक्टर शेतजमीन सिंचित करणार्या (Bawanthadi Dam) बावनथडी प्रकल्पाचे कोट्यवधी रुपयांचे पाणी पट्टी कर येथिल शेतकर्यांनी थकविले असल्याने येथिल थकीत शेतकर्यांच्या सातबारा वर थकीत पाणी पट्टीचा बोजा चढविण्याची कारवाई बावनथडी विभागाच्या वतीने महसुल विभागाने कारवाई सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे.
बावनथडी प्रकल्पाच्या (Bawanthadi Dam) पाणल़ोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस पडल्याने सप्टेंबर सुरुवातीला ६० टक्के धरण भरले आहे. पुढेही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील्यास सप्टेंबर अखेरपर्यंत शंभर टक्के धरण भरण्याची शक्यता आहे.
-आर.आर बडोले, सहाय्यक अभियंता, बावनथडी उपविभाग तुमसर