निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष वेधले
आखाडा बाळापूर/हिंगोली (Krushi Bazar Samiti) : कृषि उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूर १८संचालक पदासाठी शनिवारी मतदान झाले. तिन मतदान केंद्रात एकुण जवळपास ९६.९२टक्के मतदान झाले आहे. आज ३१ ऑगस्ट रविवार रोजी आखाडा बाळापूर, शेवाळा रोडवरील कुसमताई चव्हाण सभागृहात मतमोजणी होणार आहे. अटीतटीच्या या (Krushi Bazar Samiti) निवडणूकीत कोण बाजी मारतो याकडे लक्ष वेधले गेले आहे.
आखाडा बाळापूर बाजार समिती १८ संचालक पदासाठी शनिवारी आखाडा बाळापूर जिल्हा परिषद प्रशाला बोल्डा रोड, पोत्रा जिल्हा परिषद शाळा व पिंपळदरी जिल्हा परिषद शाळा ३ मतदान केंद्र ८ बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली. आखाडा बाळापूर जि.प.शाळा बुथ एकवर ३०९ पैकी २९९ तर बुथ चारवर ३५२ पैकी ३४१, तर बुथ सातवर ५६ पैकी ५६ व बुथ आठवर ७६ पैकी ७४ मतदान झाले याचप्रमाणे पोत्रा जि.प.शाळा बुथ दोनवर १९० पैकी १८२ तर बुथ पाचवर १७५ पेकी १६८ म्हणजे दोन केंद्रात ११५८ पैकी ११२० मतदान झाले तर पिंपळदरी केंद्रात ग्रामपंचायत २१३ पैकी २११ व सोसायटीच्या २२०पैकी २११मतदान झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
आखाडा बाळापूर सेवा सहकारी संस्था ३०९ पैकी २९९म्हणजे ९६.७६टक्के तर पोत्रा सेवा सहकारी संस्था १९० पैकी १८२म्हणजे ९५.७८ टक्के तसेच सेवा सहकारी संस्था पिंपळदरी २२०पैकी२११ म्हणजे९५.९०टक्के व ग्रामपंचायत मतदार संघ बाळापूर ३५२ पैकी३४१ म्हणजे ९६.८८ टक्के तसेच ग्रामपंचायत मतदारसंघ पोत्रा १७५पैकी १६८ म्हणजे ९६टक्के तर ग्रामपंचायत मतदारसंघ पिंपळदरी २१३पैकी २११ झाले ९९टक्के महत्त्वाच्या व्यापारी मतदारसंघात ५६पैकी ५६ शंभर टक्के तर हमाल मापाडी मतदारसंघात ७६पैकी ७४ म्हणजे ९७.३७ टक्के मतदान झाले एकुण १५९१मतदार पैकी १५४२म्हणजे ९६.९२ टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी (Krushi Bazar Samiti) निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुठ्ठे व ५० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी होणार आहे.
निवडणुकीमुळे चोख पोलिस बंदोबस्त
बाजार समिती कार्यक्षेत्र तिन तालुक्यातील १२०गावात आहे. सदर निवडणूक अटीतटीची झाली यात दोन प्रमुख गटातील आरोप प्रत्योरोपान (Krushi Bazar Samiti) निवडणूक गाजली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्वतः अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांनी मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी केली तर वसमत पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलिस निरीक्षक गणेश राहीरे,पोलीस निरीक्षक वाघ,पोलीस निरीक्षक डोंगरे,सपोनी ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, बालाजी गोणारकर, शेख खुद्दुस सह आठ अधिकारी ,तिन राज्य राखीव बल तुकडी,दंगा काबू पथक,स्थानिक १५व बाहेरील ४०असे ५५पोलीस कर्मचारी २०होमगार्ड यांचा तगडा पोलीस बंदोबस्त निवडणूक मतदान करता लावण्यात आला होता अस डीएसबीचे अतुल मस्के यांनी सांगितले. दरम्यान सकाळी कुसुमताई चव्हाण सभागृहात मतमोजणी होणार आहे. येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आज बंदोबस्त आढावा वरीष्ठांनी घेतला.