कॅमेराचे उद्घाटन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले!
परभणी (Parbhani) : परभणीतील सेलू तालुक्यातील हादगाव पावडे या सेलू-परतुर मुख्य रस्त्यावर असलेल्या गावात गुरुवार 5 जून रोजी मुख्य ठिकाणी 12 सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या बसविण्यात आलेल्या कॅमेराचे उद्घाटन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हदगाव पावडे चे सरपंच अनंता काशिनाथ पावडे, पोलीस पाटील मंगल भागवत पावडे, ग्रामपंचायत सदस्य नारायणराव आल्डे, गोविंद काष्टे, भागवत पावडे सह ग्रामस्थ (Villager) उपस्थित होते. परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी (Parbhani District Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi) यांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘सी’ नेत्र ही संकल्पना राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने हदगाव पावडे येथील सरपंच अनंता काशिनाथ पावडे आणि पोलीस पाटील मंगल भागवत पावडे यांच्या पुढाकारातून गावात मुख्य ठिकाणी बारा सीसीटीव्ही कॅमेरे (cctv Cameras) गुरुवार 5 जून रोजी लावण्यात आले. याचा शुभारंभ पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांचा यावेळी सत्कार!
हादगाव पावडे हे गाव परभणी जिल्ह्यातील शेवटचे गाव असून, ते सेलू-परतुर या मुख्य रस्त्यावर आहे. अनेक वेळा जालना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे करून आरोपी या मार्गाचा पळून जाण्यासाठी वापर करतात. त्यांची ओळख पटविण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या (Law And Order) कामे या सीसीटीव्ही कॅमेरा चा फायदा होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यश मिळेल. दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात आलेल्या पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी नेत्र संकल्पनेचे कौतुक करत ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भागवत पावडे यांनी मानले.




