हिंगोली (Hingoli) :- वसमत तालुक्यातील खुदनापूर शिवारातील आखाड्यावरून हळदीचे २० कट्टे चोरीस गेले होते. या प्रकरणात वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे.
कसून चौकशी केल्यानंतर दिली चोरीची कबुली
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कवठा पाटी परिसरात असलेल्या खुदनापूर शिवारातील आखाड्यावरून १७ ते १८ एप्रिल दरम्यान २० हळदीचे कट्टे चोरीस गेले होते याबाबत गोविंद शेषराव तिडके यांनी वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा (Crime) दाखल आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे सुरज लक्ष्मण बोगरे राहणार बोंगे सावंगी याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केल्यानंतर चोरीची कबुली दिली व त्याच्या विषयाला आलेले २५ हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले ही रक्कम जप्त करून चोरीचा गुन्हा उघड केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे वसमत ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन बोराटे पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे, पोलीस अमलदार अविनाश राठोड, विजय पंडित, जयकुमार वराडे, नामदेव बेंगाळ, सायबर सेलचे पोलीस शिपाई प्रदीप झुंगरे, मारुती काकडे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी करून गुन्हा उघड केला आहे. या गुन्ह्यामध्ये अन्य तीन चोरट्यांचा समावेश असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.




