Parbhani accident :- परभणीतील जिंतूर तालुक्यातील जिंतूर – परभणी रस्त्यावरील औंढा टी पॉईंटवर मुसळधार पावसात(Heavy rain) एक चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटी झाले. ही घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. अपघातात (Accident)दोघेजण गंभीर जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
मुसळधार पावसात कार पलटी सुदैवाने जीवीतहानी नाही
हिंगोलीहून नाशिककडे निघालेला वाहनांचा ताफा औंढा महामार्गावरुन जिंतूरकडे वळत असताना समोर जात असलेल्या एम.एच. ३८ -६५०६ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या बाजुला खड्ड्यात जाऊन अपघातग्रस्त झाले. या अपघातात वाहनामधील गणेश कोंडीबा गिरी (वय २७ वर्ष, रा. भाडेगाव हिंगोली), अभिमन्यु ज्ञानबाराव ढोणे (वय ४५ वर्ष, रा. सुरतनगर हिंगोली), शंकर भिकाजी जवळकर (वय २२ वर्ष, रा. हिंगोली) हे गंभीर जखमी झाले. जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. पारवे यांनी प्राथमिक उपचार केले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात एकूण पाच जण जखमी आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सरनाईक, पो.ना. केदारी यांनी नागरिकांच्या मदतीने मदतकार्य राबविले. दरम्यान, या अपघाताचे कारण म्हणजे जिंतूर -परभणी रस्त्याचे गत सात वर्षापासून कासवगतीने सुरु असलेले काम अपूर्ण असलेला रस्ता आहे. सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.