केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार
अमरावती (Achyut Maharaj Heart Hospital) : श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टीट्यूटच्या (Achyut Maharaj Heart Hospital) नवीन इमारतीचे व कॅथलॅबचे लोकार्पण शनिवार २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर व उपाध्यक्ष सुधीर दिवे यांनी दिली. यावेळी संत सचिन देव महाराज उपस्थित होते.
सेवा कार्यातून हॉस्पिटलचा (Achyut Maharaj Heart Hospital) कारभार सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने नव्या इमरातीची आवश्यकता होती. त्यामुळेच २५० खाटाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्यात दोन शस्त्रक्रिया कक्ष, कॅथलॅब, अतिदक्षता विभागासह आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा राहणार आहे. या कार्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराजांच्या भक्त मंडळींनी भरीव सहकार्य केले. रुग्णालयात आता २ कॅथलॅब, चार शस्त्रक्रिया कक्ष, दोन अतिदक्षता कक्ष, याशिवाय वेगवेगळे वार्ड व स्वतंत्र खोल्या तयार करण्यात आल्या आहे.
सुविधा झाल्याने रुग्णांची प्रतीक्षा यादीतली संख्या कमी होईल. (Achyut Maharaj Heart Hospital) हार्ट हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ह्रदयाच्या विविध प्रकारच्या ६४ हजार ३१० शस्त्रक्रिया झाल्या आहे. यातल्या ९५ टक्के शस्त्रक्रिया केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतूनच झाल्याने रुग्णांसाठी त्या नि:शुल्कच ठरल्या आहे. विदर्भातल्या कानाकोपर्यातून रुग्ण हॉस्पिटमध्ये येतात. त्यांच्यासोबत नातेवाईक सुद्धा असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरच हॉस्पिटल परिसरात धर्मशाळेचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. एकदा ती तयार झाली की उत्तम सोय होईल.
संत अच्युत महराजांनी दिलेल्या उपदेशावरच हे (Achyut Maharaj Heart Hospital) हॉस्पिटल कार्यरत आहे. प्रत्येक रुग्णाचे समाधान महाराजांच्या कृपेने येथे होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. ह्रदयविकाराने ग्रस्त ज्या मुलीच्या प्रेरणेतून हे हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प महाराजांनी केला, त्या मुलीचा सत्कारही कार्यक्रमात होणार असल्याचे, सुधीर दिवे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सचिव सागर पासेबंद, कोषाध्यक्ष मुकुंद वाईकर, विश्वस्त सुधीर जोशी, शुभदा पोतदार, डॉ. मुरलीधर वाडेकर, मनोज वाडेकर यांच्यासह दत्ता शिंदे, डॉ. गुणवंत डहाणे, वैद्यराज चर्जन व हॉस्पिटचे काही कर्मचारी हजर होते.