शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांची संयुक्त कार्यशाळा!
रिसोड (Admission Process Workshop) : रिसोड येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत वर्ग 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 11 व्या वर्गात प्रवेश घेण्यासंबंधी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संदर्भात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांची संयुक्त कार्यशाळा (Joint Workshop) दिनांक 17 मे 2025 शनिवारला भारत माध्यमिक व उच्च शाळेच्या (Bharat Secondary and High Schools) सभागृहात पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री संजय भांडेकर, प्रमुख अतिथी म्हणून उपप्रचार्य श्री संजय शर्मा, पर्यवेक्षक श्री ज्ञानेश्वर थोरात हे उपस्थित होते तसेच वर्ग दहावीचे सर्व वर्गशिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक (Professor) वर्ग याप्रसंगी व्यासपीठावर विराजमान होते.
सर्व ऑनलाईन प्रणालीची माहिती पालकांना करून दिली!
सत्र 2025-26 पासून शालेय शिक्षण विभागाने वर्ग 11वी ची सर्व प्रवेशप्रक्रिया (Admission Process) ही ऑनलाइन राबविण्यात येणार आहे, असे नुकतेच परिपत्रक काढले. त्यामुळे शाळेचे नुकतेच 10 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या सर्व ऑनलाईन प्रक्रियेची (Online Process) व्यवस्थित माहिती व्हावी व त्यांना प्रवेश घेणे सोपे व्हावे, म्हणून ही कार्यशाळा आयोजित केल्या गेली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक श्री देवीकांत देशमुख यांनी केले. त्यानंतर, जेष्ठ शिक्षक श्री काटे सर यांनी या सर्व ऑनलाईन प्रणालीची माहिती पालकांना करून दिली. त्यानंतर शाळेचे प्राचार्य श्री भांडेकर सर यांनी विद्यार्थी व पालकांना उद्देशून वर्ग 11वी ला ऑनलाईन प्रवेश घेताना तसेच महाविद्यालयाची नावे टाकताना कोणती काळजी घ्यावी, प्राधान्यक्रम कसा द्यावा व आपली प्रवेश कसा सुनिश्चित करावा त्याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला शाळेचे बहुसंख्या प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेला बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची सुद्धा उपस्थिती लाभली. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालकांनी (Parents) समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री डी. एन. देशमुख यांनी केले.